October Hit Saam Tv
मुंबई/पुणे

October Hit: नागरिकांनो काळजी घ्या! ऑक्टोबर हिटने होणार अंगाची लाही-लाही, जाणून घ्या कसं असेल तापमान

Maharashtra Weather Update: मुंबई हवामान विभागानं ऑक्टोबर हिटचा इशारा दिलाय.

Bharat Jadhav

Maharashtra October Hit:

मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. राज्यातील अनेक भागातून मान्सूनने निरोप घेतलाय. तसेच देशातील अनेक भागातून मान्सून बाहेर पडला आहे. त्याआधी ऑक्टोबर हिटचा इशारा मुंबई हवामान विभागानं दिलाय. ऑक्टोबर हिट उद्यापासून म्हणजेच १० किंवा ११ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. (Latest News)

ऑक्टोबर हिट १० ते १४ ऑक्टोबरपर्यंत जाणावणार आहे. यादरम्यान मुंबईच्या उपनगरातील तापमान हे ३४ ते ३५ डिग्री सेल्सिअसमध्ये असेल. तसेच १२ ते १४ ऑक्टोबरमध्ये तापमान थेट ३७ डिग्री सेल्सिअस असणयाची शक्यता आहे. दरम्यान यंदा ऑक्टोबर हिटचे चटके अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीचं वर्तवला होता.

महाराष्ट्रात जुलैमध्ये चांगलाच पाऊस बरसल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला. त्याच दिवसापासून ऑक्टोबर हिटची सुरुवात झाली होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. तापमान वाढल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा आणि बिहारच्या काही भागातून मान्सून माघारी फिरलाय. महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीलाच आणखी काही भागातून मान्सून परतणार आहे. सध्या पुणे, मुंबई, कोकणासह अन्य भागातून पाऊस परतलाय. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT