Heavy Rain Warning Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Alert: राज्यात मुसळधार! मुंबईसह कोकण-घाटमाथ्याला हाय अलर्ट; पुण्यात अतिवृष्टीचा इशारा, एका क्लिकवर वाचा IMD अंदाज

Today Heavy Rain Warning For Konkan Ghatmatha Pune Mumbai: राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसानं थैमान घातलंय. मुंबई, पुणे जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

Rohini Gudaghe

गिरीश कांबळे, साम टीव्ही मुंबई

मुंबई पुण्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. मुंबईला आज पावसाचा सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आलाय. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. मुंबईत काल २५ जुलै रोजी रात्रीपासून पावसाने थोडी उसंत घेतली होती. परंतु आज सकाळपासून पुन्हा पावसाने जोर पकडल्याचं पाहायला मिळतंय.

मुसळधार पावसाचं थैमान

पावसाच्या पार्श्वभू्मीवर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला (Maharashtra Weather Forecast Update) आहे. सिंधुदुर्ग, पुणे, पालघर, ठाणे, मुंबई आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा इशारा हवामान विभागाने दिलाय.

मुंबईला रेड अलर्ट

नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात (Rain Update) आलाय. अमरावती, वर्धा, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. नागरिकांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभू्मीवर सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. उर्वरित राज्यामध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली (Rain Alert) आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभू्मीवर सतर्कतेचं आवाहन

पावसाने कोकण आणि घाटमाथ्यावर चांगलाच दणका दिलाय. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अनेक शहरांत नदी-नाल्यांना पूर आल्याचं समोर (Heavy Rain Warning) आलंय. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी स्थलांतर करावं आणि सावधगिरी बाळगावी, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. रस्ते खचल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक देखील बंद झाल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT