Vande Bharat Saam Tv
मुंबई/पुणे

Indian Railway: वंदे भारतच्या २४ फेऱ्या महाराष्ट्रातून, सर्वाधिक जाळं पुण्यात, वाचा कोणती Vande Bharat कुठून धावते?

24 Vande Bharat Trains In Maharashtra List : देशातून एकूण १६४ वंदे भारत एक्सप्रेस धावतात. यातील २४ वंदे भारत एक्सप्रेस या महाराष्ट्रातून जातात.

Siddhi Hande

देशात १६४ वंदे भारत धावतात

महाराष्ट्रातून जाणाऱ्या २४ वंदे भारत एक्सप्रेसची यादी

वंदे भारत एक्सप्रेसमुळे कनेक्टिव्हिटी वाढली

देशातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणजे वंदे भारत. वंदे भारत ट्रेनमुळे अनेकांच्या प्रवासाचा वेळ वाचला आहे. वंदे भारतमुळे कनेक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. देशात अनेक ठिकाणांहून वंदे भारत ट्रेन धावत आहेत.दरम्यान,संसदेत मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील वंदे भारत ट्रेनबद्दल माहिती दिली आहे.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशभरात सध्या १६४ वंदे भारत ट्रेन चालवल्या जात आहेत. यातील २४ वंदे भारत एक्सप्रेस या महाराष्ट्रातील स्थानकांवरुन जातात. यामध्ये त्या वेगवेगळ्या स्थानकांवरुन प्रवास करतात. यामुळे पुण्यातून जाणाऱ्या अनेक वंदे भारत एक्सप्रेसचचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून जाणाऱ्या वंदे भारत (Vande Bharat Trains List)

२६१०१/२६१०२ पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेस, ११ ऑगस्टपासून सुरु झाली असून आठवड्यातून सहा दिवस धावते.

२०१०१/२०१०२ नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस, १९ सप्टेंबर २०२४ पासून सुरु, आठवड्यातून सहा दिवस धावते.

२०६६९/२०६७० हुबळी पुणे वंदे भारत एक्सप्रेस, १८ सप्टेंबर २०२४ पासून सुरु, आठवड्यातून तीनवेळा धावते.

२०६७३/२०६७४ कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस, १८ सप्टेंबर २०२४ पासून सुरु, आठवड्यातून तीन दिवस धावते.

२२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस ९ मार्च २०२४ रोजी सुरु झाली. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावते.

२०७०५/२०७०६ हाय स्पेस नांदेड-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस ३० डिसेंबर २०२३ रोजी सुरु, आठवड्यातून सहा दिवस धावते

२२२२९/२२२३० सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, २८ जून २०२३ रोजी सुरु, आठवड्यातून सहा दिवस धावते.

२०९११/२०९१२ इंदोर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस, २७ जून २०२३ रोजी सुरु झाली, आठवड्यातून सहा दिवस सेवा सुरु

२२२२३ / २२२२४ सीएसएमटी- साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस, ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरु, आठवड्यातून सहा दिवस धावते.

२२२२५ /२२२२६ सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस, आठवड्यातून सहा दिवस सुरु

२०८२५/२०८२६ बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस, आठवड्यातून सहा दिवस धावते

२०९०१ / २०९०२ मुंबई सेंट्रल-गांधीनगर कॅपिटल वंदे भारत एक्सप्रेस, आठवड्यातून सहा दिवस धावते.

२०७०५/२०७०६ जालना-छत्रपती शिवाजी महाराज वंदे भारत एक्सप्रेस परभणीमार्गे असून ती एचएस नांदेडपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar : नामांकित कॉलेजकडून २०० विद्यार्थ्यांची फसवणूक, हॉल तिकीट देण्यास नकार; नेमका काय प्रकार?

Washington Sundar: कोणाला डेट करतोय वॉशिंग्टन सुंदर? जाणून घ्या कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Pune : पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेवर आणखी एक गुन्हा, नवरा-बायकोच्या वादात...

Face Serum : नासलेले दूध फेकून देताय? थांबा! हिवाळ्यात बनवा 'असा' फेस सीरम, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

SCROLL FOR NEXT