Abdul Sattar Controversy : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अब्दुल सत्तारांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्यामुळे त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या आहेत. अब्दुल सत्तारांच्या शिवीगाळ प्रकरणाची राज्याच्या महिला आयोगानेही दखल घेतली आहे. महिला आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याने राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. राज्यात काही ठिकाणी सत्तारांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर काही ठिकाणी सत्तारांचा पुतळा जाळण्यात आला आहे.
राज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सत्तारांच्या मुंबई आणि औरंगाबादच्या घरावरही दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेतली आहे.
प्रति,
मा. पोलीस महासंचालक,
शहिद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई-400 039
विषय : श्री. अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत.
महोदय,
वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी खासदार श्रीमती सुप्रियाताई सुळे यांच्याबाबत अवमानास्पद उद्गार काढले आहेत. ही बाब महिलेचा सामाजिक दर्जा व तुल्य हनन करणारी आहे. याबाबत अनेक तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाले आहेत. श्री. अब्दुल सत्तार यांच्या विरुद्ध काळ कारवाई करावी, अशी
मागणी अर्जदार यांनी केली आहे. सोबत तक्रार अजांच्या प्रती जोडत आहेत. तरी उपरोक्त प्रकरणी चौकशी करुन तात्काळ कारवाई करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 चे कलम 12 (2) व 12(3) नुसार अहवाल सादर करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.