Maharashtra News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

Maharashtra State Road Transport : दिवाळीसाठी राज्य परिवहन महामंडळ ९०२ विशेष फेऱ्या चालवणार आहे. एसटीच्या ताफ्यात नव्या २४०० गाड्यांची भर पडली असून प्रवासी प्रवास आरामदायी होणार आहे.

Alisha Khedekar

  • दिवाळीसाठी राज्य परिवहन महामंडळाने राज्यभर ९०२ विशेष फेऱ्यांची घोषणा केली.

  • गेल्या नऊ महिन्यांत एसटी ताफ्यात २४०० नव्या बसगाड्यांची भर पडली आहे.

  • ऑनलाईन आरक्षण, प्रवासी पास आणि तपासनीसांची नेमणूक यामुळे प्रवास सोयीस्कर होणार आहे.

  • आवश्यकता भासल्यास आणखी फेऱ्या वाढवण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे.

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने दिवाळीसाठी यंदा राज्यभरातून ९०२ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या नऊ महिन्यांत महामंडळाच्या ताफ्यात दोन हजार ४०० बसगाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांचा एसटी प्रवास आरामदायी होणार असून आवश्यकता भासल्यास आणखी फेऱ्या चालवण्यात येतील, असा विश्वास महामंडळाच्या वाहतुक विभागाने व्यक्त केला आहे.

एसटीचा दिवाळी हंगाम १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान आहे. ऑनलाइन आरक्षणासाठी विशेष फेऱ्या एसटीच्या अधिकृत वेबसाइटसह अधिकृत दलालांच्या माध्यमातून उपलब्ध करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच, विशेष वाहतुकीतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष मार्ग तपासनीसांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असे पत्र वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक नितीन मैंद यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना पाठवले आहे.

प्रवासी गैरसोय टाळण्यासाठी तिकीट आवश्यकतेनुसार खिडकीची वेळ वाढवण्यात यावी. सर्वच आरक्षण केंद्रांवर चार आणि सात दिवसांचे प्रवासी पास उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान एसटीच्या ताफ्यात नव्या दोन हजार चारशे गाड्यांची भर पडली आहे.

यात वातानुकूलित आणि साध्या (लालपरी) अशा दोन्ही प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे आवश्यकता भासल्यास आणखी विशेष फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे, असेही एसटी महामंडळाने सांगितले. एसटी महामंडळाच्या या नियोजनाने यंदाच्या दिवाळीत प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

'या' शहरात धावणार विशेष फेऱ्या

  • मुंबई - २४० विशेष फेऱ्या

  • पुणे - २९२ विशेष फेऱ्या

  • संभाजीनगर - ६२ विशेष फेऱ्या

  • नाशिक - १४२ विशेष फेऱ्या

  • अमरावती - ६२ विशेष फेऱ्या

  • नागपूर - ४ विशेष फेऱ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT