Tet exam  saam tv
मुंबई/पुणे

TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार ; 'इतक्या' उमेदवारांवर होणार कारवाई

शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकार केलेल्या उमेदवारांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून कारवाई आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आदेशानुसार २९३ उमेदवारांवर कारवाई केली जाणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

TET 2019 : शिक्षक पात्रता परिक्षेमध्ये (TET) झालेल्या गैरप्रकार केलेल्या उमेदवारांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून कारवाई आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आदेशानुसार २९३ उमेदवारांवर कारवाई केली जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ साली घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ ही परीक्षा १९ जानेवारी २०२० रोजी परीक्षेमध्ये काही उमेदारांकडून गैरप्रकार झाला. सन २०१९-२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत सायबर स्टेशनच्या पुणे शहरात काही उमेदवारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली. त्या तपासात निष्पन्न झाले की, ७८८० उमेदवार परीक्षेत गैरप्रकारात सामिल असल्याचे दिसून आले आहे. या उमेदवारांनी गैरप्रकाराच्या माध्यमातून स्वतःस पात्र करून घेतलेले आहे.

दरम्यान, शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल हा दि. २८/०८/२०२० रोजी परीक्षा परिषदेच्या स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार १६७०५ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी काही उमेदवार गैरप्रकारामध्ये समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले. २९३ उमेदवारांनी आरोपीसोबत बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. तर उर्वरीत ८७ उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात असल्याचे आढळून आलेले आहे. गैरप्रकारमध्ये समाविष्ट उमेदवार यांच्या विरुद्ध परीक्षा परिषदेने शास्ती निश्चित केलेला सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT