Pune Superstition News Saam tv
मुंबई/पुणे

Pune News : महिलेला हाडांची पावडर, राखेचं पाणीही पाजलं; अघोरी कृत्याची महिला आयोगाकडून दखल

Pune Superstition News : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात महिलेसोबतचे अघोरी कृत्य उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रातून संताप आणि चीड व्यक्त केली जात आहे.

Saam TV News

सचिन जाधव

Pune Superstition News : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात महिलेसोबतचे अघोरी कृत्य उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रातून संताप आणि चीड व्यक्त केली जात आहे. या घटनेची थेट महिला आयोगाने दखल घेतली असून, पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशा सूचना केल्या आहेत.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. पतीसह सासरच्या मंडळीनं पैशांच्या मोहापायी महिलेला हाडांची पावडर आणि राखेचे पाणी पाजले होते. सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास असह्य झाल्याने महिलेने पोलिसांत तक्रार केली होती. (Latest Marathi News)

या प्रकरणाची आता राज्य महिला आयोगाने (Maharashtra State Commission for Woman) दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशा सूचना आयोगाने केली आहे. पुणे येथील या घटनेप्रकरणी दोषारोपपत्र सादर होणे गरजेचे आहे, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. या प्रकरणी सिंहगड रोड (Sinhagad Road) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

नेमका हा प्रकार काय आहे?

पीडितेचा विवाह ठरल्यानंतर सोने-चांदी द्यावे लागतील, तसेच पंचतारांकित हॉटेलात जेवण द्यावे लागेल, अशी मागणी पोकळे कुटुंबीयांनी केली होती. त्यानंतर हा विवाहसोहळा पार पडला होता. पण काही दिवसांतच महिलेला छळवणुकीला सामोरे जावे लागले होते.

घरातील अनेक जण अमावस्येला एकत्र येऊन काळे कपडे घालून काहीतरी रहस्यमय करत असल्याचे तिने पाहिले. घरात सुख-शांती नांदावी आणि मूल व्हावं यासाठी प्रत्येक अमावस्येला अशीच पूजा होत असे. या पूजेमध्ये विवाहितेलाही सहभागी करण्यात आले होते.

एका अमावस्येला तर पतीसह सर्व मंडळींनी तिला घराजवळील स्मशानभूमीत नेलं. स्मशानात असलेल्या प्रेताची हाडे आणि राख घरी आणली आणि त्याची पूजा केली. इतक्यावरच हे थांबलं नाही तर, ती राख पाण्यात टाकून जबरदस्तीनेने तिला पिण्यासाठी दिली. तर हाडांची पावडर करून तिला खाऊ घातली. या सगळ्या त्रासाला वैतागून आखेर महिलेने पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली.

२०१९ पासून सुरू होता हा अघोरी प्रकार

पुणे शहरातील धायरी भागात हा अघोरी प्रकार २०१९ पासून सुरू होता. लग्नानंतर पतीसह त्याच्या घरच्यांनी तिच्याकडे पैशांची अनेकदा मागणी केली होती. लग्नात दिलेले दागिने आणण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी तिचा मानसिक आणि शारिरीक छळ करायचे. घराची भरभराट व्हावी आणि मूल व्हावे यासाठी पती, सासू-सासरे, दीर-जाऊ या सगळ्या जणांनी मिळून अघोरी आणि जादूटोणा करून पूजा देखील घातली होती. सासरच्या जाचाला कंटाळून अखेर या महिलेने पोलिसांत धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात; पहिल्या दोन षटकात पाकिस्तानचे दोन फलंदाज गारद

Crime: अरविंदचं तिसरं लग्न, नंदिनीचा पाचवा नवरा; भररस्त्यात डोक्यात गोळ्या झाडल्या, फेसबुकवर लाईव्ह करत...

Face Care: महागडे फेसवॉश वापरण्यापेक्षा या घरगुती सामग्रीने चेहरा धुण्यास करा सुरुवात, मिळेल सोफ्ट ग्लोईंग स्किन

Akola : मूकबधिर मुलीवर राहत्या घरात विनयभंग, तोंडावर रुमाल दाबून गळा दाबला; अकोल्यात भयकंर घडलं

MVP Annual Meeting: नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वार्षिक सभेत राडा|VIDEO

SCROLL FOR NEXT