MAHARASHTRA CRACKDOWN ON SECTION 155 MISUSE: 15 REVENUE OFFICIALS SUSPENDED IN PUNE LAND RECORD FRAUD CASE Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : मोठी कारवाई! जमीन फेरफार घोटाळा प्रकरणी १५ महसूल अधिकारी निलंबित

Maharashtra 15 Revenue Officers Suspended : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम १५५ च्या गैरवापराप्रकरणी राज्य सरकारची मोठी कारवाई. पुण्यातील १५ महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Alisha Khedekar

  • पुण्यातील १५ महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन

  • ४२४ संशयास्पद प्रकरणे आढळली

  • संबंधित अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम १५५ चा गैरवापर करून जमिनींच्या मालकी हक्काच्या नोंदींमध्ये बेकायदेशीर फेरफार केल्याप्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिलेल्या माहितीनुसार उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांसह १५ महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच या १५ जणांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून काहींना सेवेतून बडतर्फ देखील करण्याचा इशारा दिला आहे.

मागील विधिमंडळ अधिवेशनात उबाठाचे विधान परिषद सदस्य अनिल परब यांनी कलम १५५ च्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर सरकारने सखोल चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. याप्रकरणानंतर आता संपूर्ण राज्यात मागच्या ५ वर्षांत ‘कलम- १५५’ अंतर्गत देण्यात आलेल्या सर्व आदेशांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यासाठी ३ महिन्यांची मुदत देण्यात आली असून, याचा कृती अहवाल पुढील अधिवेशनात मांडला जाईल.

चौकशी अहवालानुसार पुणे विभागात एकूण ४२४ प्रकरणे संशयास्पद आढळून आली. त्यापैकी १३ गंभीर प्रकरणांमध्ये थेट जबाबदार असलेल्या १५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय २४७ प्रकरणांमध्ये नियम ८ अंतर्गत विभागीय चौकशीची शिफारस करण्यात आली असून, उर्वरित १६४ प्रकरणांमध्ये नियम १० अंतर्गत तपास होणार आहे. काही प्रकरणांमध्ये पुरावे लपवण्यासाठी सरकारी फायली गहाळ केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक अभिलेख अधिनियम, २००५ अंतर्गत संबंधितांवर स्वतंत्र फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

बावनकुळे यांनी सांगितले की, चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित झालेल्या जमिनी मूळ मालकांना परत मिळवून देण्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, गेल्या पाच वर्षांत कलम १५५ अंतर्गत मंजूर झालेल्या सर्व आदेशांचे राज्यव्यापी लेखापरीक्षण करण्यात येणार असून, तीन महिन्यांत पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT