Mumbai Maharashtra Rain Updates
Mumbai Maharashtra Rain Updates Saam TV
मुंबई/पुणे

Monsoon in Mumbai Coincidence: मान्सूनबाबत जुळून आला अनोखा योगायोग; तब्बल ६२ वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडलं

Satish Daud

Monsoon In Mumbai Coincidence: गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस अखेर सुरू झाला आहे. रविवारी मान्सूनने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. उत्तर भारतातही मान्सूनने चांगलाच जोर पकडला असून अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान, मान्सूनबाबत अनोखा योगायोग जुळून आला असून तब्बल ६२ वर्षांनंतर पहिल्यांदाच मुंबई आणि दिल्लीत एकाचवेळी मान्सून दाखल झाला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हवामान खात्याच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे.

मान्सूनबाबत जुळून आला अनोखा योगायोग

साधारणपणे मुंबईत दिल्लीच्या १५ दिवस आधी पाऊस दाखल होतो. मुंबईत १० ते १५ जूनदरम्यान मान्सूनच्या (Monsoon 2023) पावसाला सुरूवात होते. तर दिल्लीत सामान्यपणे ३० जूनला पाऊस हजेरी लावतो. अशा स्थितीत एकीकडे मुंबईत पाऊस दोन आठवडे उशीरा दाखल झाला असताना, दुसरीकडे दिल्लीत मात्र, ५ दिवस आधीच कोसळला आहे.

यापूर्वी २१ जून १९६१ साली मुंबई (Mumbai) आणि दिल्लीत एकाच दिवशी मान्सून दाखल झाला होता. दोन्ही शहरांमध्ये पावसाने धुव्वाधार बँटिंग केली होती. त्यानंतर तब्बल ६२ वर्षांनी म्हणजेच २५ जून २०२३ रोजी हा योगायोग जुळून आला असून मुंबई आणि दिल्लीत एकाच दिवशी मान्सून दाखल झाला असून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईत येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र, शनिवारी (२४ जून) दुपारपासून मुंबईत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. रविवारी दुपारपर्यंत सुरू असलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान, येत्या २४ तासांत मुंबईसह उपनगरात पावसाचा (Rain Alert) जोर वाढणार असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणीही समुद्र किनारी जाऊ नये, पाऊस सुरू असताना झाडाखाली थांबू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दिल्लीत या ठिकाणी पावसाची शक्यता

दरवर्षीच्या तुलनेत यंदा दिल्लीत मान्सून ५ दिवसआधीच दाखल झाला. रविवारी दिल्ली आणि एनसीआरमधील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. पावसाचा हा जोर आता कायम राहणार असून पुढील तीन ते चार तासांत यमुनानगर, करनाल, पानिपत, आदमपूर, हिस्सार, गोहाना, गन्नौर, सिवानी, सोनपत, रोहतक, भिवानी आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पडदा बाजूला करुन उद्धव ठाकरेंच्या NDAसोबत येण्याच्या थेट हालचाली सुरू, शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा

Imtiyaz Jaleel News | जलिल यांच्या घराला घेराव, लोकविकास परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

Nilesh Lanke News | अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून Sujay Vikhe पराभूत होतील?

Amravati Lok Sabha Exit Poll | विजयाचा कौल राणांच्या बाजुने, पण खरा निकाल काय?

Ravi Rana News | उद्धव ठाकरेंच्या संदर्भात रवी राणांचा मोठा दावा,नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT