Maharashtra Rain Alert Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

Maharashtra Rain Alert Today: राज्यातील पावसाचा जोर काही कमीच होत नाहीये. आजदेखील मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे.

Siddhi Hande

राज्यात कालपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यानंतर आजदेखील पावसाचा जोर काय राहणार आहे. आजदेखील मुंबईत रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याता आला आहे. याचसोबत शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

पुढील २४ तास अतिमुसळधार (Maharashtra Rain Alert Today)

राज्यात पुढील २४ तासांसाठी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. १७ ते २१ ऑगस्टपर्यंतच अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जर महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच जर काही अडचण आली तर महापालिकेने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. १९१६ या नंबरवर संपर्क साधू शकतात.

मुंबईत रेड अलर्ट (Mumbai Rain Update Red Alert)

पुढील २४ तासांसाठी मुंबई, रायगड, पुणे घाट, सातारा घाट,रत्नागिरी, कोल्हापूर घाट या ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत तर पहाटेपासूनच पावसाचा जोर कायम आहे. याचसोबत पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव,छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपुर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

तसेच INCOIS तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरीत किनारपट्टी भागात उंच लाटांचा इशारा दिला आहे. समुद्राची स्थिती खवळलेली आहे व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंब्रात इमारतीचा सज्जा कोसलळा, एका महिलेचा मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात ऊन पावसाचा खेळ, विदर्भाला यलो अलर्ट, वाचा पावसाचा अंदाज

Success Story: लहानपणी गाई चरायला घेऊन जायच्या, लग्नासाठी कुटुंबाकडून दबाव, तरीही मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS सी वनमथी यांचा प्रवास

Pitru Paksha 2025 : पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू, या 4 राशींनी वेळीच जाणून घ्या उपाय; अन्यथा...

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

SCROLL FOR NEXT