Maharashtra Rain Update Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Update: नेरळ रेल्वे स्थानकामध्ये पावसाचे पाणी घुसले

आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी घुसले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे (Rain) अनेक ठिकाणी पाणी घुसले आहे. रस्त्यांवर पाणी साठल्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. तर नेरळ स्थानकात पावसाचे पाणी घुसले आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. कामासाठी मुंबईत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे.

पावसामुळे (Rain) अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. माथेरानमध्ये शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर रस्त्यांवर पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.

मुंबई, उपनगरांत पावसाचा धुमाकूळ घातला आहे. मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे, सखल भागांत पाणी, रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

मध्य रेल्वे उशिरा धावणार

मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाला आहे. यामुळे रेल्वे पटरीवर पाणी साचले आहे. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा धावणार आहे. ठाण्याच्या स्थानकावर तांत्रिक बिघाड झाला आहे. ठाण्यातून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिरा धावत आहे. तर ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांनाही उशिर लागत आहे. पाण्याचा निचरा करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे, पण पाऊस मुसळधार सुरू असल्याने पुन्हा पाणी साठा होत आहे.

आज पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. ठाणे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल बंद झाली. सध्या प्रशासनाकडून लोकल बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. त्यानंतर स्लो ट्रॅक सुरू होईल, याला अजून काही वेळ लागू शकतो. दरम्यान, ठाणे स्थानकात लोकलमध्ये झालेल्या बिघाडामुळे कळवा, मुंब्रा अशा स्थानकात देखील मध्य रेल्वेच्या धीम्या ट्रॅकवरील लोकल खोळंबल्या आहेत.

तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरीवली ते वांद्रे आणि अंधेरीत बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले,आणि सांताक्रुज दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरच पुन्हा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT