maharashtra rain update Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Rain : राज्यासाठी पुढील ४८ तास महत्वाचे; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, शाळांना सुट्टी

पुढच्या 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मागील आठवडाभरापासून राज्यातील (Maharashtra) विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे (Rain) राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशातच पुढचे 48 तास राज्यासाठी अतिमहत्वाचे आहे. कारण पुढच्या 48 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharasta Rain Latest Updates)

मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाचा जोर वाढणार

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील 48 तासांत मुंबईत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या सखलभागात पाणी साचण्याची भीती व्यक्त होत आहे. भागात सोमवारीपासून मुसळधारपासून पडत आहे. सोमवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढला असून मंगळवारी पहाटेही पावसाचा जोर कायम होता. संपूर्ण दिवसभर मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी

पावसाचा वाढता जोर बघता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक पाठोपाठ पुण्यातील काही तालुके वगळता इतर सर्व तालुक्यातील 12वी पर्यंतच्या सर्व शाळांना 14 जुलै ते 16 जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमीत केले आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT