MAHARASHTRA RAIN UPDATE: YELLOW ALERT IN MUMBAI, PUNE AND SATARA AS MONSOON REVIVES  Saam Tv
मुंबई/पुणे

Rain Alert : राज्यात मुसळधार पाऊस, आज मुंबईसह २० जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; पुढील ८ दिवस जोर कायम राहणार

Maharashtra Weather Today Update News : राज्यात आज मुंबईसह २० जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असून या पावसामुळे लोकल उशिराने धावत आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात पावसाने पुन्हा जोर धरला

  • मुंबईसह २० जिल्ह्यांना यलो अलर्ट

  • मुंबईतील लोकल सेवा पावसामुळे १० ते २० मिनिटे उशिराने

  • पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र आता बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. पुढील काही दिवस हा जोर कायम राहणार आहे. आज सकाळपासून मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाची सुरुवात झाली आहे. या पावसामुळे लोकलसेवा धिम्यागतीने धावत आहे. कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून २० जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. उर्वरित राज्यात मात्र ऊन आणि ढगांचा लपंडाव सुरू राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडू शकतात. हवामानातील या बदलामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल उशिराने

मुंबईत पावसाने रविवार पासून दमदार सुरुवात केली. आज सकाळी देखील पावसाने जोर धरला असून मुंबईला यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे लोकल उशिराने धावत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेची लोकल १५ ते २० मिनिटांनी उशिराने धावत आहे, तर हार्बर मार्गावर लोकल सेवा १० मिनिटे उशिराने आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : प्रेमाने नाती जोडवा, ५ राशींच्या व्यक्तीची होणार चांदीच चांदी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

SCROLL FOR NEXT