Maharashtra Rain Alert Next 5 Days heavy rain warning in mumbai Pune Konkan Marathwada and vidarbha Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील ४ ते ५ दिवस धो-धो पाऊस बरसणार, मुंबईसह १७ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Rain Forecast: कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

साम टिव्ही ब्युरो

Rain Alert in Maharashtra: गेल्या आठवडाभरापासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, आता राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला असून पुढील ५ दिवसांत बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळेल असा, अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईसह तब्बल १७ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून राज्यात उशीराने दाखल झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दमदार आगमन केलं. मुंबईतही पावसाने (Rain News) दमदार बॅटिंग केली. पण आठवडाभरापासून काही भागात पावसाने उसंत घेतली होती. पण आता राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील ४ ते ५ दिवस मान्सून सक्रिय (Monsoon 2023) राहणार आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

याशिवाय कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट व जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातही ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुण्यात मात्र यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरात बुधवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीही होऊ शकते.

साताऱ्यात घाट परिसरात बुधवार ते शुक्रवार ऑरेंज अॅलर्ट आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rain Alert) होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईत सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर आणखीच वाढणार, असंही हवामान खात्याने सांगितलं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT