Maharashtra Rain Alert heavy rain in maharashtra today rain news live| Saam TV Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Rain Alert: पुढील २४ तास धोक्याचे! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, IMD कडून 'ऑरेंज अलर्ट'

Rain News Today: हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. गुरूवारी राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

Satish Daud

Rain News in Maharashtra Today Marathi: हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला. गुरूवारी राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीचा मार्ग मोकळा झाला असून बळीराजा सुखावला आहे. एकीकडे शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली असताना दुसरीकडे हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

येत्या २४ तासांत राज्यात पावसाचा जोर (Weather Updates) आणखीच वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. आज म्हणजेच शुक्रवारी राज्यातील ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईला आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

आज राज्यातील ७ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. यामध्ये पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, वर्धा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईसह ठाण्याला यलो अलर्ट

सध्या मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग (Monsoon 2023) सुरू आहे. ठाण्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काही सखल भागामध्ये पाणी साचल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. पुण्यातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

अशातच मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार असं हवामान खात्याने सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे, नाशिक, धुळे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात मात्र आज पावसाच्या सरी कोसळणार नसल्याचा अंदाज आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT