Buldana Bus Accident Forensic Report: विदर्भ ट्रॅव्हल्स अपघातासंदर्भात मोठी अपडेट; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Samruddhi Mahamarg Bus Accident Forensic Report: समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात हा चालकाच्या चुकीमुळे घडल्याचं समोर आलं आहे. अपघातावेळी बस चालक शेख दानिश याने मद्यप्रान केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Samruddhi Mahamarg Bus Accident Updates
Samruddhi Mahamarg Bus Accident UpdatesSaam TV
Published On

Vidarbha Travels Bus Accident Updates: ३० जून २०२३ रोजी नागपूरवरून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स या खाजगी बसचा बुलढाण्यातील सिंदखेडराजा शिवारात भीषण अपघात झाला. या अपघातात २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर ७ प्रवाशी जखमी झाले.

पोलिसांनी (Police) आता या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून एक अहवाल समोर आला आहे. समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात हा चालकाच्या चुकीमुळे घडल्याचं समोर आलं आहे. अपघातावेळी बस चालक शेख दानिश याने मद्यप्राशन केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Samruddhi Mahamarg Bus Accident Updates
Nagpur Nursing Student Dies: पाणीपुरी खाल्ल्याने BSC नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू? नागपुरातील खळबळजनक घटना

दानिश याच्या शरीरात मद्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा ३० टक्के जास्त होते असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. एबीपी माझाने याबाबतच वृत्त दिलं आहे. एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, अमरावती (Amravati) येथील रीजनल फॉरेंसिक सायन्स लँबोरिटिने यासंदर्भातला फॉरेन्सिक तपास केला आहे.

त्यांच्या अहवालामध्ये बसचालक शेख दानिश याच्या शरीरात अपघाताच्या दिवशी मद्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा ३० टक्के जास्त होते, असे अहवालात नमूद करण्यात आल्याची माहिती आहे.

त्यामुळे समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) विदर्भ ट्रॅव्हल्सचा अपघात चालकाने मद्यपान केल्याने घडला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष बाब म्हणजे बसचा अपघात हा टायर फुटल्याने झाला असा दावा बसचालक शेख दानिश याने केला होता.

Samruddhi Mahamarg Bus Accident Updates
Solapur News: सोलापुरात भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्यासह ४ माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम

मात्र, एका खासगी फॉरेन्सिक संस्थेने टायर फुटल्याने हा अपघात झाला नसल्याचा खुलासा केला होता. दरम्यान, आता विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातासंबंधी वेगवेगळे अहवाल समोर येत असून हा अपघात मानवी चूक आणि बेजबाबदारपणाने गाडी चालवण्याने घडला असावा, असेच तपशील आता समोर येत आहे.

अपघातानंतर पोलिसांनी बसचालक दानिश शेख याला अटक करून ताब्यात घेतलं असून त्याच्यावर आयपीसीचे कलम ३०४ आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १३४,१८४ आणि २७९ लावण्यात आले आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com