Heavy Rainfall Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Weather Update : पुण्यात मुसळधार पावसाचा कहर, एकता नगर पाण्याखाली, भिडे पूल वाहतुकीसाठी बंद

Heavy Rainfall Pune: पुण्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरातील एकता नगर परिसर पाण्याखाली गेला आहे. तसेच भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Alisha Khedekar

  • पुणे जिल्ह्यात सततच्या मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी.

  • खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदी दुथडी भरून वाहते.

  • भिडे पूल वाहतुकीसाठी बंद, अनेक रस्ते पाण्याखाली.

  • प्रशासन व एनडीआरएफ पथके सज्ज; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने पुण्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून याचा फटका पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागालाही बसत आहे. शहरातील एकता नगर परिसर पाण्याखाली गेला असून अनेक सोसायट्या आणि घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी शिरले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ते जलमय झाल्याने प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुठा नदी सध्या दुथडी भरून वाहत असून नदीपात्रातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मुठा नदीत सध्या ३५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून हा विसर्ग वाढवून ३९ हजार क्युसेक्सपर्यंत नेण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे नदीपात्राजवळील सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्यातील भिडे पूलही पाण्याच्या प्रवाहात धोक्याच्या स्थितीत आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे जुन्या पुण्यातून जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्याने नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. पायाभूत सुविधा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

महापालिका व जिल्हा प्रशासनाने पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके तैनात केली आहेत. एनडीआरएफची पथकेही पुण्यात सज्ज ठेवण्यात आली आहेत. गरज असल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेषतः मुठा, मुळा व पवना नदी पात्रातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

Visapur Fort History: महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी विसापूर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT