boyfriend kills girlfriend after marriage fixed in Pune AI
मुंबई/पुणे

Pune : पुणे हादरलं! गर्लफ्रेंडचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडचे डोकं फिरलं; फ्लॅटवर आणून हत्या केली अन्...

girlfriend killed : गणेश काळे याने दिव्या निगोश हिची फ्लॅटमध्ये हत्या करून स्वतःही रेल्वेखाली आत्महत्या केली. मुलीचे लग्न ठरल्यामुळे हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Namdeo Kumbhar

Pune murder-suicide case of Ganesh Kale and Divya Nigoshe : दोघे एकाच ठिकाणी काम करायचे, काही काळानंतर दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध प्रेमात बदलले. तिच्या प्रेमात तो आकंठ बुडाला. अपार प्रेम करायचा, पण मुलीचं लग्न ठरलं अन् पोराचं डोकं फिरलं. मनात वाढत गेलेला राग शेवटी टोकाला पोहोचला. "ती माझी होणार नसेल तर कुणाचीच होऊ देणार नाही," असा विकृत विचार त्याच्या डोक्यात आला. त्याने गर्लफ्रेंडला फ्लॅटवर बोलावले अन् हत्या केली. त्यानंतर स्वत:ही ट्रेनखाली आत्महत्या केली. पुण्यातील या घटनेने महाराष्ट्र हादरलाय. गणेश काळे आणि दिव्या निगोश अशी मृतांची नावे आहेत. (boyfriend kills girlfriend after marriage fixed in Pune)

बीडचा गणेश काळे पुण्यामध्ये कामासाठी आला होता. एका नामांकित रूग्णालयात त्याची पुण्यातील दिव्या निगोश हिच्यासोबत मैत्री झाली. याच मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. पण मुलीचे लग्न ठरले अन् प्रेमाचा अंत झाला. गणेश काळे यावे दिव्याला आपल्या फ्लॅटवर बोलवले अन् तिचा निर्घृण खून केला. त्यानंतर त्यानेही जीव दिला. तळेगाव रेल्वे ट्रॅकवर गणेशचा मृतदेह आढळला. प्रेमप्रकरणातून घडलेल्या या घटनेने पुणे हादरले.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गणेश काळे हा बीडचा असून दिव्या पुण्यातील विमानतळ भागातील राहायला होती. तिचे वडील पोलिस कर्मचारी आहेत. गणेश आणि दिव्या हे दोघेही पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात लॅब टेक्नेशियन म्हणून काम करत होते. शनिवारी रात्री तळेगाव परिसरातील रेल्वे ट्रॅकवर गणेशचा मृतदेह आढळला. त्याच दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तिच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

पोलिसांकडून मुलीचा शोध घेतला जात होता. दिव्या निगोश ही महिला मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली होती. तिचा मृतदेह गणेश याच्या या संगमवाडी येथील फ्लॅटमध्ये आढळला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. मुलीच्या नाकावर आणि चेहऱ्यावर व्रण आहेत. त्यामुळे खून करून मुलाने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

आधी मारहाण केली, मग....

दिव्या हिचे लग्न ठरल्यामुळे गणेश याला प्रचंड वेदना झाल्या होत्या. तू माझी होऊ शकत नाही, तर कुणाचीच नाही, अशी भावना त्याच्या मनात आली. त्याने दिव्याला प्लॅटवर बोलवले. तिथे दोघांमध्ये झटापट झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. गणेश याने दिव्याला आधी मारहाण केली अन् नंतर खून केल्याचा अंदाज पोस्टमार्टम रिपोर्टनुसार बांधला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोरमध्ये सभा

अजित पवारांच्या आमदाराने 4 वर्षीय चिमूकलीला उडवले, पाहा अपघाताचा थरारक|VIDEO

Winter Health : थंडीत मोजे घालून झोपणं पडू शकतं महागात, शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम

Hiv AIDS Day2025: HIV प्रकरणांमध्ये 49% घट; भारतात एड्स मृत्यूंमध्ये 80% पेक्षा जास्त घसरण, पाहा संपूर्ण आकडेवारी

Masoor Dal Chivda Recipe: मार्केटमध्ये मिळणारा कुरकुरीत मसूर डाळ मिक्स चिवडा घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT