Ashock Chavan News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: आताची सर्वात मोठी बातमी, अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

Ashok Chavan News: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. मंगळवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

Satish Daud

Ashok Chavan Latest News

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. मंगळवारी (१३ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे १० ते १२ आमदार देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. (Latest Marathi News)

सोमवारी (१२ फेब्रुवारी) त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिल्याने या चर्चांनी अधिकच जोर धरला. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) लवकरच भाजपचे कमळ हाती घेणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.

मात्र, मी फक्त काँग्रेसचे सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला असून भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिलं होतं. मात्र, चव्हाण यांचा आजच भाजपमध्ये प्रवेश होणार असून त्यांच्यासोबत काँग्रेसचे १० ते १२ आमदार देखील असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस (आघाडी) सरकारमध्ये वरिष्ठ मंत्रीपदे भूषवली आहेत. ते दोन वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी देखील दोन वेळा काँग्रेसकडून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून राहिलेली पिता-पुत्रांची ही एकमेव जोडी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT