Sanjay Raut On Devendra Fadnavis Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut On Devendra Fadnavis: सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांचे कौतुक का केलं? संजय राऊत यांनी सांगितलं कारण

Sanjay Raut Praised CM Devendra Fadnavis: सामनाच्या अग्रलेखामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले आहे. यामागचे कारण काय आहे हे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Priya More

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. देवेंद्र फडणवीस नवीन वर्षात पहिल्याच दिवशी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. गडचिरोलीचा दौरा करताना त्यांनी आपल्याला गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायला आवडेल असे मत व्यक्त केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या या गडचिरोली दौऱ्यावरूनच सामना अग्रलेखातून त्यांचे कौतुक करण्यात आले.

'बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाचे राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस कौतुकास पात्र आहेत.', अशापद्धतीने सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक का करण्यात आलं यामागचं कारण शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

संजय राऊत यांनी सांगितले की, 'देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. सरकारचे आणि त्यांच्याशी नक्कीच राजकीय मतभेद आहेत. मतभेद असल्यावर एकमेकांवर टीका होते. महाराष्ट्रातील राजकारण टीकेपुरतं मर्यादित राहिलेला नाही तर जहरी टीका होऊ लागली आहे. तरीही आपण सगळे या राज्याचे काही तरी देणं लागतो. हे राज्य आपले आहे. या राज्यात एखादं सरकार आमच्या विचारांचे नसेल. पण त्यांनी एखादे चांगले पाऊल उचललं असेल आणि राज्याची कायदा सुव्यवस्था, सामाजिक समीकरणे यांना दिशा देणार असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केले पाहिजे. ही भूमिका शिवसेनेची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे.'

मुख्यमंत्र्यांच्या कौतुकाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक का करू नये. गडचिरोलीसारखा जिल्हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. तिथे ज्या प्रकारचे हत्याकांड असेल, पोलिसांचे बळी गेले, सामान्य माणसांचे बळी गेले नक्षलवादामुळे. हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर हे सुवर्णभूमी आहे. ही पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल. जमशेदपूरनंतर गडचिरोली हे पोलाद सिटी बनविले जात असेल आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाती काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं आहे. फडणवीस यांच्यासमोर १० खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमोर पण केलं आणि त्यांनी संविधान हाती घेतलं. याचे प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला कौतुक असला पाहिजे. मोदींनी जेव्हा चांगली काम केले तेव्हा आम्ही त्यांचे कौतुक केलं. गडचिरोलीत विकासाची गंगा वाहत असेल तर त्याचा जर कोणी कौतुक करणार नसेल तर ते चुकीचं आहे. या आधीच्या पालकमंत्र्यांचे काम आम्ही पाहिलं आहे. म्हणून मला विकासाचे काम महत्त्वाचे वाटले.'

तसचं, 'नक्षलवाद नष्ट होणार असेल आणि मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललं असेल तर त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करणं आपल्या सर्वांचं काम आहे. यात जवळीक साधण्याचा प्रयत्न काय आहे. शिवसेना पक्ष संस्कार- संस्कृती आणि शिष्टाचार या त्रिसूत्रीवर काम करणारा पक्ष आहे. आम्ही संभ्यता पाळतो. आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्हाला आणखीन पाच वर्षे विरोधी पक्षात काम करावे लागेल. राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे काम मोठं असावं लागतं. शिष्टाचार म्हणून माजी मुख्यमंत्री सध्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असेल. पण सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सतत संवाद सुरू असतो. त्याची अनेक साधनं असतात. आणि त्या साधनांचा वापर होत असतो. सामनाच्या माध्यमातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारले असेल तर ते कौतुकास्पद आहे.' , असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT