Ramdas Kadam Criticized Ravindra Chavan Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मेंटल, कुत्रा, युती... रामदास कदमांची जीभ पुन्हा घसरली, रवींद्र चव्हाणांवर बरसले

Ramdas Kadam Criticized Ravindra Chavan: शिदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजपचे नेते रवींद्र वायकर हे दोघेही एकमेकांवर जोरादार टीका करत आहेत. आता रामदास कदम यांची पुन्हा जीभ घसरली आहे.

Priya More

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महायुतीमध्ये देखील असंच चित्र पाहयाला मिळत आहे. महायुतीतील घटक पक्षांचे नेते एकमेकांचा चांगलाच समाचार घेत आहेत. शिदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजपचे नेते रवींद्र वायकर हे दोघेही एकमेकांवर जोरादार टीका करत आहेत. आता रामदास कदम यांची पुन्हा जीभ घसरली आहे. रामदास कदम यांनी रवींद्र वायकर यांना मेटल म्हटले आहे.

रामदास कदम यांनी रवींद्र वायकरांवर टीका करताना सांगितले की, 'हा थोबाड फोडायच्या गोष्टी करतोय. जसं काही याला पागल कुत्रा चावलाय. थोबाड फोडायच्या गोष्टी तू काय करतो. भूंकणारा कुत्रा चावत नाही. मी या सगळ्यातून गेलो आहे. रवींद्र चव्हाण हा सातत्याने महायुतीत मिठाचा खडा टाकायचे काम करतोय. युती तोडण्याचा प्रयत्न करतोय.'

'आदरणीय मोदी साहेब, आदरणीय भागवत साहेब यांना मी १० दिवसांअगोदर पत्र पाठवले. त्या पत्रात याचे कोकणातले सगळे कारणामे लिहिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मुलाला श्रीकांत शिंदेला कसा त्रास दिला. दापोलीत हा काय करतोय. हा पागल झालाय मेंटल झालाय. याला युती कळत नाही.', असे म्हणत रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.

दरम्यान, रामदास कदम यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रीपदाचा फडणवीस यांनी राजीनामा घ्यावा, अशी टीका एका कार्यक्रमात केली होती. रामदास कदम यांच्या वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी कदम यांच्यावर निशाणा साधला होता. 'मुख्यमंत्र्यांना एवढेच सांगेन युतीधर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण यांचा नाही, तर तो सर्वांनी पाळला पाहिजे. भाजप म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे. मात्र, सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे.', असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT