Ajit Pawar And Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: शरद पवारांकडे विधानसभेच्या अर्जांचा ढीग, छगन भुजबळ, धनंजय मुंडेंविरोधात लढण्यासाठी सर्वाधिक अर्ज

Vidhan Sabha Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गट अजित पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. अजित पवार गटाच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवण्यासाठी शरद पवार गटाकडे अर्जांचे ढीग लागले आहेत.

Priya More

रूपाली बडवे, मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. कोणत्याही क्षण विधानसभा निवडणुकीच्या तारखा आणि आचारसंहिता लागू होऊ शकते. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेला देखील चांगला विजय मिळवण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. अशामध्ये या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे टेन्शन जास्त वाढणार आहे. कारण अजित पवार गटाच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढण्यासाठी शरद पवार गटातील इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांविरोधात लढण्यासाठी शरद पवार गटातील इच्छुकांची संख्या वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवार गटाकडे इच्छुकांनी मोठी गर्दी केली आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवारांकडे अर्जांचा ढीग लागला आहे. त्यामुळे शरद पवार गटाकडून जर तगडा उमेदवार दिला गेला तर अजित पवार यांच्या गटाचे टेन्शन खूपच वाढणार आहे.

या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी -

धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघ - १३ अर्ज

दिलीप वळसे पाटील यांचा आंबेगाव मतदारसंघ - ३ अर्ज

अनिल पाटील यांचा अमळनेर मतदारसंघ - २९ अर्ज

संजय बनसोडे यांचा उद्गगीर मतदारसंघ - १२ अर्ज

धरामराव बाबा आत्राम यांचा अहेरी मतदारसंघ - ७ अर्ज

अदिती तटकरे यांचा श्रीवर्धन मतदारसंघ - ३ अर्ज

हसन मुश्रीफ यांचा कागल मतदारसंघ - ८ अर्ज

छगन भुजबळ यांचा येवला मतदारसंघ - ११ अर्ज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight in WIFI : फ्लाइट मोडचा जमाना गेला! आता विमानात मनसोक्त इंटरनेट वापरता येणार, कसं? वाचा सविस्तर

Virat Kohli Childrens Name: विराट कोहलीच्या मुलांची नावे काय? तुम्हाला माहितीये का?

Places To Visit Near Manali: निसर्गाच्या सानिध्यात सेलिब्रेट करा वाढदिवस; पाहा मनालीच्या आसपास लपलेली सुंदर पर्यटन स्थळे

Mumbai crime : गुजरातच्या व्यक्तीचा मुंबईत मृत्यू, अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवताना आला हार्ट अटॅक

Fort: दिवाळीच्या सुट्टीत अशी करा धमाल, मित्र परिवारासह 'या' गड किल्यांना द्या भेट

SCROLL FOR NEXT