Uddhav Thackeray Thane Visit:  Saamtv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: 'घालीन लोटांगण, वंदिन चरण', उद्धव ठाकरेंच्या सभेआधी विरोधकांकडून बॅनरबाजी, ठाण्यात राजकारण तापलं!

Uddhav Thackeray Thane Visit: गजकरी रंगायतन नाट्यगृहात आज संध्याकाळी हा मेळावा होणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत

Gangappa Pujari

वैदैही कानेकर, मुंबई|ता. १० ऑगस्ट २०२४

शिवसेना ठाकरेगटप्रमुख उद्धव ठाकरे हे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. या सभेआधी उद्धव ठाकरे यांना डिवचणारे बॅनर्स लावण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन या बॅनर्समधून टीका करण्यात आली आहे.

ठाणे शहरामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडणार आहे. गजकरी रंगायतन नाट्यगृहात आज संध्याकाळी हा मेळावा होणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये राजकारण चांगलेच तापले आहे.

ठाकरे गटाच्या या मेळाव्यापूर्वीच ठाणे शहरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन डिवचणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे हे हे राष्ट्रवादी काँग्रेसते नेते शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासमोर लोटांगण घालत असल्याचे व्यंगचित्रांचे मोठे होर्डिंग अनेक ठिकाणी लागले आहेत.

दरम्यान, हे बॅनर्स कोणी लावले हे समोर आले नसले तरी या बॅनर्समुळे ठाण्यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, या बॅनरवरुन राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांकडून हे बॅनर्स हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आजच्या ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: सिरोंचा तालुक्यातील मुत्तापूर पुलिया पाण्याखाली; सहा गावे संपर्काबाहेर, गर्भवतीला बैलबंडीने नेण्याची वेळ

CM टार्गेट, हनीट्रॅपमध्ये मंत्र्यांचा पोरगा,जंतर-मंतर आंदोलन; STF नं 'उधळला जैश-ए-मोहम्मदचा मोठा कट

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळणार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट

हॉटेलच्या रुममध्ये पांढऱ्या बेडशीटच का असतात, काळ्या रंगाच्या का नाही? कारण काय?

SCROLL FOR NEXT