Uddhav Thakceray And Eknath Shinde  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाण घेतलं हाती

Uddhav Thakceray And Eknath Shinde : शिंदे गट राज्यभरात मिशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के देत आहे. अशामध्ये ठाकरे गटाला शिंदे गटाने ठाण्यात मोठा धक्का दिला. ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली.

Priya More

ठाण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या १० पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतलं आहे. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तावर या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

शिंदे गटाकडून राज्यात मिशन टायगर सुरू आहे. या माध्यमातून शिंदे गट एकापाठोपाठ ठाकरे गटाला धक्के देत आहे. राज्यभरातील अनेक ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरूच आहे. आता ठाण्यात देखील शिंदे सेनेची ताकद वाढली आहे.

आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाण्यातील उद्धव ठाकरे गटातील विभाग प्रमुख प्रकाश पायरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत १० कार्यकर्त्यांनी देखील शिंदेगटात प्रवेश केला.

राज्यभरात एकनाथ शिंदे सेनेची ताकद वाढवत असतानाच आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ठाण्यातील नौपाडा या ठिकाणी उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश दिला. या प्रवेशामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. या पक्ष प्रवेशामुळे एकनाथ शिंदेंची शहरातील ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT