Legal trouble deepens for Vasant More as court rejects anticipatory bail plea. Saam tv
मुंबई/पुणे

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Vasant More Atrocity Case: पत्रकार परिषदेत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वसंत मोरे यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Bharat Jadhav

  • पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

  • जामीन फेटाळल्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता वाढली आहे.

  • आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.

ठाकरे सेनेचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची आज कोर्टात सुनावणी झाली असून पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्या मानेवर अटकेची टांगती तलवार लटकली आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये वसंत मोरे यांनी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करताना आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी २५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत "लहाडे दारू पिला होता, त्याला बोलता येत नव्हतं. ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत होता', असं वक्तव्य मोरे यांनी केलं होतं, असं फिर्यादीने सांगितले होतं.

दरम्यान वसंत मोरे यांचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या वक्तव्यामुळे लहाडे यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आणि समाजातील स्थानावर परिणाम झाला असं फिर्यादींनी म्हटलं होते. या प्रकरणात वसंत मोरे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता.

मात्र पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने अर्ज नाकारला. ॲड. आकाश साबळे सर, ॲड. कपिल शिवशरण यांनी जोरदार युक्तिवाद करत फिर्यादींच्या वतीने बाजू मांडली. या वेळी फिर्यादी अविनाश लहाडे आणि वंचित बहुजन आघाडीचे ओंकार कांबळे, अभिजीत बनसोडे, युवा आघाडीचे अक्षय कांबळे, विपुल सोनवणे आणि अनेक पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

SCROLL FOR NEXT