Sanjay Raut addressing the media amid rising political tensions over NCP unity before civic elections. saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मुंबईत दोस्ती तर पुण्यात कुस्ती; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून ठाकरे गटाने थोपटले दंड

Sanjay Raut Warn NCP: महापालिकेच्या निवडणुकांसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात युती होणार आहे. त्यावरून ठाकरे गटाने संजय राऊत यांनी गंभीर इशारा दिलाय. मुंबईत युती असेन मात्र पुण्यात आम्ही राष्ट्रवादीसोबत नसणार असं संज्य राऊत यांनी स्पष्ट केलंय.

Bharat Jadhav

  • मुंबईत दोस्ती, पुण्यात कुस्ती अशी राजकीय स्थिती

  • दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ठाकरे गट बाहेर राहणार

  • संजय राऊतांचा अजित पवार गटाला स्पष्ट इशारा

महापालिका निवडणुकांमध्ये राज्यातील मोठ्या घटना घडणार आहेत. एकीकडे ठाकरे गट आणि मनसेची युती होणार आहे. तर दुसरीकडे काका-पुतण्या एकत्र येणार आहेत. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. मात्र त्यावरून संजय राऊतांनी अजितदादांना इशारा देत राष्ट्रवादीविरुद्धात दंड थोपटले आहेत.

नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांप्रमाणे महापालिकेच्या निवडणुका गुंतागुंतीच्या ठरणार आहेत. या निवडणुकांमध्येही अगळ्यावेगळ्या युत्या आणि आघाड्या होताना दिसत आहेत. एका ठिकाणी मित्र असणारे पक्ष दुसरे ठिकाणी एकमेकांविरुद्धात लढत लढणार आहेत. इकडे महायुतीमध्ये सत्तेचे वाटेकरी असणारे राष्ट्रवादी आणि भाजप पुण्यात एकमेकांचा पराभव करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसनं मुंबत स्वबळाचा नारा दिलाय.

दरम्यान पुण्यात भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या अर्थात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार आहेत. मात्र त्यामुळे पुण्यात भाजपविरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे-मनसे अशी आघाडी होणार, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र यात नवा ट्विस्ट आलाय. जर अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र आल्यास ठाकरे गट त्यांच्यासोबत जाणार नाही, असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय.

ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची घोषणा उद्या होणार आहे. उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर करतील, याची माहिती संजय राऊत यांनी माध्यामांना दिली. त्यावेळी त्यांनी पुण्यातील राजकीय स्थिती आणि तेथे होणाऱ्या नव्या आघाडीबाबत सुतोवाच केले. अजित पवार हे जातीयवादी पक्षासोबत आहेत. त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत.

जर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अजित पवारांना महायुतीत राहण्याचा अधिकार नाही. जर दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली तर निवडणुकीत ठाकरे गट त्यांच्यासोबत जाणार नाही. पुण्यात मनसे आणि ठाकरे गटाची युती असेन. तेथे जर काँग्रेसला आमच्यासोबत यायचं असेल ते आमच्यासोबत असतील. पुण्यात आणि नाशिकमध्ये आमची काँग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

दरम्यान देशाच्या संविधानाच्या आरक्षणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यात माननीय शरद पवार हे महत्त्वाचे आमचे मार्गदर्शक आहेत. मोदी आणि शहा आहे लोकशाहीच्या मारेकरी आहेत असे पवार साहेबांची भूमिका आहे, ती कायम आहे. जर आज शरद पवार यांच्याबरोबर आमचे चर्चा संपली, तर शरद पवार देखील आमच्या उद्याच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये येतील, असेही राऊत म्हणालेत.

मनसे आणि आमची मुंबई आणि इतर महानगरपालिकेत युती होत आहे. सातत्याने दोन्ही बाजूच्या चर्चा झाल्या आहेत. उद्या दुपारी १२ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र महानिर्वाण सेना प्रमुख राज ठाकरे एकत्रितपणे पत्रकारांशी संवाद साधतील. जवळ जवळ जागावाटप संदर्भात ज्या प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत त्या झाल्या आहेत.

मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा-भाईंदर नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिका मध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलाय. त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती दोन्ही बाजूच्या चर्चा नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या चर्चा जवळजवळ संपल्या आहेत, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी

Wednesday Horoscope: लक्ष्मी उपासना चांगलं फळ देईल, या राशीची पैशाची समस्या वाढेल, वाचा बुधवारचे राशीभविष्य

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याने साथ सोडली

Haunted Historical Places : पर्यटक 'या' किल्ल्याला भेट देण्यास घाबरतात, इतिहासात लपलंय गूढ

Wedding Fashion Tips: लग्नाना जाताना साडीच कशाला, लेहेंग्याच्या 'या' डिझाईन्स ट्राय करा, दिसाल सगळ्यात हटके

SCROLL FOR NEXT