Maharashtra Loksabha Election:
Maharashtra Loksabha Election: Saamtv
मुंबई/पुणे

Shirur Loksabha: राजकारण सोडेल पण आढळराव पाटलांसोबत एकत्र येणार नाही; मोहिते पाटलांचा विरोध कायम

रोहिदास गाडगे

Shirur Loksabha Election 2024:

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटीलांनी आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला विरोध करत राजकारणातून निवृत्ती घ्यायची वेळ आली तरी चालेल पण पंधरा वर्ष ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांना जवळ करणार नाही अशी भुमिका घेत राष्ट्रवादी कॉग्रेस प्रवेशाला विरोध केला होता.

मात्र आढळराव पाटील यांनी मोहिते पाटील यांची भेट घेतल्याने दोन कट्टर विरोधकांमध्ये मनोमिलन झाले का? अशी चर्चा रंगली होती. परंतु या भेटीनंतरही दिलीप मोहिते पाटील यांनी आपला विरोध कायम असल्याची भूमिका घेतली आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघातून अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरोधात महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे ही जागा जाणार असल्याने आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करुन घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र आढळराव पाटील यांच्या या प्रवेशाला आमदार मोहिते पाटील यांनी विरोध दर्शवला आहे.

काय म्हणाले दिलीप मोहिते पाटील?

"शिवाजीराव आढळराव पाटील उमेदवार म्हणुन भेटीला आले नाहीत आणि निवडणूकीसाठी मदत करा असेही म्हणाले नाहीत त्यामुळे आमच्यातले मतभेट टोकाचे आहेत. महायुतीमधून आम्ही एकत्र असलो तरी ते मतभेद मिटले नाहीत. आता उमेदवारी मिळेल अशी शक्यता असल्याने त्यांनी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला," असे मोहिते पाटील म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच "पुणे जिल्ह्यात निर्णय घेण्याचे अधिकार वळसे पाटील यांना आहेत. ऐनवेळी उमेदवार उभा केला तर निवडून येत नाही, असे म्हणत पक्ष नेतृत्वाकडून विश्वासात घेतलं जात नसल्याची खंत व्यक्त करत आढळराव पाटीलांना मदत करण्यासाठी सांगण्यात आलं तर राजकारण सोडुन घरी बसेल अशी स्पष्ट भुमिका खेडचे आमदार दिलीप वळसेपाटीलांनी घेतली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Water Crisis : हर्सूल तलावाने गाठला तळ; केवळ अडीच टक्के साठा शिल्लक

Health Tips : तळलेलं तेल पुन्हा जेवणात वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो कॅन्सर, ICMR च्या अभ्यासातून नवीन माहिती उघड

Sangli News: पाय घसरला, अनर्थ घडला, शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; गावावर शोककळा

Jalgaon Gold-Silver Rate News : सोने-चांदीने पुन्हा उच्चांक गाठला!

Liver Health: दररोज करा हे 2 योगासन, यकृत राहील निरोगी

SCROLL FOR NEXT