Manoj Jarange Patil: मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Maratha Aarkshan News: पुण्यातील वाघोलीमध्ये विना परवाना स्पीकर लावून, विना परवाना सभा घेतल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह आयोजकांवर दीड महिन्यांंनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Manoj Jarange Patil Announce Sabha at Beed For Maratha Aarakshan
Manoj Jarange Patil Announce Sabha at Beed For Maratha AarakshanSaam TV

सचिन जाधव, पुणे|ता. १० मार्च २०२४

Manoj jarange Patil:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जानेवारी महिन्यात मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे उपोषणासाठी गेले होते. यावेळी मुंबईकडे जात असताना त्यांनी विविध भागात सभाही घेतल्या होत्या. या दरम्यान, पुण्यातील वाघोलीमध्ये विना परवाना स्पीकर लावून, विना परवाना सभा घेतल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यासह आयोजकांवर दीड महिन्यांंनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना ते मुंबई असा प्रवास केला होता. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी जाहीर सभाही घेतल्या होत्या. या यात्रेदरम्यान २३ जानेवारी रोजी वाघोली येथे त्यांचा मुक्काम होता. या ठिकाणी जरांगे पाटील यांची सभाही पार पडली होती.

याठिकाणी मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांची पहाटे तासभर सभा झाली होती. यादरम्यान, आयोजकांनी विनापरवाना स्पीकर लावून, विना परवाना सभा घेऊन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीतील लोणीकंद पोलीस ठाण्यात जरांगे पाटील यांच्यासह ८- १० जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil Announce Sabha at Beed For Maratha Aarakshan
Dhule Politics: भाजपच्या खेळीनंतर धुळे लोकसभा निवडणुकीत 'पाटील विरुद्ध पाटील' सामना रंगण्याची चिन्ह

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून तब्बल ९०० एकरवर जंगी सभा घेणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं आहे. बीडमध्ये ही सभा होणार आहे. (Latest Marathi News)

Manoj Jarange Patil Announce Sabha at Beed For Maratha Aarakshan
Breaking News: भगर आणि शिंगाड्याचे पीठ खाल्ल्यामुळे ५० हून अधिक नागरिकांना विषबाधा, नागपूरमधील धक्कादायक प्रकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com