Sanjay Raut on Amit Shah Speech Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut on Amit Shah: 'ये डर अच्छा है...' अमित शहांच्या भाषणानंतर संजय राऊतांचं सूचक ट्वीट

Sanjay Raut News: अमित शहांच्या भाषणानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

Satish Daud

Sanjay Raut on Amit Shah Speech: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी यांची शनिवारी नांदेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत अमित शहा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारत चौफेर टीका केली. खरा दगा हा तर उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीवर जावून बसले, अशी टीका अमित शाह यांनी केली. दरम्यान, अमित शहांच्या भाषणानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं. (Latest Marathi News)

काय म्हणाले संजय राऊत?

"गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचे नांदेड येथील हे भाषण निवांत ऐका. मजेशीर आहे.मला प्रश्न पडला आहे.हे भाजपा चे महा संपर्क अभियान होते की.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करण्याचे खास आयोजन. अमित भाई यांच्या भाषणातील२० मिनिटात ७ मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून ही मातोश्री चा धसका कायम", असं ट्विट संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.

"शिवसेना फोडली. नाव आणि धनुष्य बाण गद्दार गटास लबाडी करून दिले.तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे.ये डर अच्छा है.जे प्रश्न त्यांनी उध्दव ठाकरे यांना विचारले त्यावर खरे तर भाजपने त्यावर चिंतन करायला हवे.पण ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले.एवढा धसका घेतलाय", असंही ते ट्विटमध्ये म्हणाले.

अमित शहा काय म्हणाले होते?

नांदेडच्या सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मी भाजपचा अध्यक्ष होतो. मी आणि देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो. युतीला बहुमत मिळालं तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं उद्धव ठाकरे यांनी मान्य केलं होतं. पण जेव्हा निवडणुकीचे निकाल समोर आले, तेव्हा त्यांनी दिलेलं वचन तोडलं. सत्तेसाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जावून बसले, अशी टीका अमित शहा यांनी केली. (Maharashtra Political News)

“मी उद्धव ठाकरे यांना विचारु इच्छितो, हिंमत असेल तर आपली भूमिका स्पष्ट करा. ट्रिपल तलाक हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. त्यावर आपण सहमत आहात का नाही? अयोध्येत राम मंदिर बांधलं जात आहे. त्यावर तुम्ही सहमत आहात की नाहीत? राम जन्मभूमीवर मंदिर बनलं पाहिजे की नाही? भाजपचे अनेक सरकार कॉमन सिव्हिल कोर्ट आणण्याचा विचार करत आहे. तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्हाला कॉमन सिव्हिल कोर्ट हवं की नको?”, असे प्रश्नही अमित शहा यांनी सभेतून ठाकरेंना विचारले होते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT