मयुर राणे, मुंबई|ता. १३ जून २०२४
अजित पवार यांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाने ब्रँड गमावला अशी टीका करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांना खडेबोल सुनावले होते. यावरुनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच मोदी शहांविरोधात तुम्ही नेतृत्व करा, असे आवाहनही त्यांनी मोहन भागवत यांना केले. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले संजय राऊत?
"एका जमान्यात आरएसएस भाजपची मातृसंस्था होती. आरएसएसने एक नैतिक ताकद भाजपाला दिली. परंतु भाजपने आता आरएसएसला संपवण्याचे ठरवलं आहे. ज्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा मोदी करत होते त्याच सर्वांना भाजपने आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून देशात आणि महाराष्ट्रात आपण कायम राहू यासाठी प्रयत्न केले," असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
"मोदी आणि शहा यांनी अहंकारांच्या सर्व मर्यादा सोडली आहे आणि त्यामध्ये आरएसएस आले. भाजपामध्ये जे आरए एसची लोक बसलेली आहेत ते मोदींना विरोध करणार का? मोहन भागवत कुठे काश्मीर- मणिपूरमध्ये गेले? जर तुम्ही जात असाल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत. बोलून काय होणार तुम्ही नेतृत्व करा आम्ही तुमच्यासोबत येऊ," असे आवाहनही संजय राऊत यांनी केले.
"सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत जायची इच्छा आहे. छगन भुजबळ यांना देखील राज्यसभेत जायची इच्छा आहे, हे मी वाचत आहे आणि ऐकत आहे. अजित पवारांनी ज्या पक्षाचे नेतृत्व स्वीकारले आहे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. हळूहळू या गटात दुफळी माजतील," हे भाजपच्या मालकी हक्काचे पक्ष आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.