Balasaheb Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीत...', शिंदेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीत ठेवण्यात आला होता, असा खळबळजनक दावा शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Priya More

Summary -

  • रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा केला.

  • मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला.

  • दसरा मेळाव्यातील या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबईमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटाचे दसरा मेळावा पार पडले. या मेळाव्यामध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचा मेळावा मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये पार पडला. या मेळाव्यात भाषण करताना शिंदेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावा केला. 'बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता.', असा दावा त्यांनी केला. त्याचसोबत, 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीत का ठेवण्यात आला? याचा तपास करावा.', अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत धक्कादायक विधान करताना सांगितले की, 'शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता.', याची माहिती काढण्यात यावी अशी मी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती करतो. मी बाळासाहेब यांच्याबाबत हे विधान जबाबदारीने करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर हातांचे ठसे घेण्यासाठी त्यांचा मृतदेह २ दिवस तसाच ठेवण्यात आला होता. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर आहेत. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. २ दिवस त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर का ठेवला होता. त्यांचे अंतर्गत काय चाललं होतं?', असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

तसंच, 'बाळासाहेब ठाकरें यांच्याबाबत मी जे वक्तव्य केले आहे याची माहिती मला डॉक्टरांनी दिली होती. मातोश्रीवर तशी चर्चा देखील सुरू होती.', असे देखील ते म्हणाले. 'ये तो झाकी है, अभी बहोत कुछ बाकी है. आमच्या मुळावर उठणार तर आम्ही बोलणारच. अजून खूप काही बाकी आहे. आम्ही हळूहळू सगळं बोलणार आहोत. हे तर काहीच नाही आहे. जेवढे माझ्या मुलाच्या मागे लागणार तेवढं मी अजून बोलणार. शिवसेना आम्ही वाढवली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली नाही. माझ्या मुलाच्या मागे लागताय. राजीनामा मागताय. त्याला टार्गेट करतात.हे सर्व सूड भावनेने तुम्ही वागत आहात.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

Heart Attack: बिछान्यावर झोपल्यावर खोकला, पाय सुजतायेत? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Ramleela Dance Video: 'कलयुग की रामलीला', रावणाच्या दरबारामध्ये महिलांचा अश्लिल डान्स; 'आज की रात..' गाण्यावर ठुमके, पाहा VIDEO

Petrol Diesel Price: वाहनधारकांना दिलासा मिळणार! पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता

Bile duct cancer: पित्तनलिकेच्या कॅन्सरच्या सुरुवातीला शरीरात होतात 'हे' बदल; वेळीच निदान वाचवेल तुमचा जीव

SCROLL FOR NEXT