Pune MNS News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : पुण्यात मनसेला मोठं खिंडार, जयंत पाटलांनी गेम केला; राज ठाकरेंचा विश्वासू नेताच फोडला

Pune MNS News : राज्यात एकीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट असा राजकीय सामना रंगला असतानाच दुसरीकडे शरद पवार गटाने मनसेला मोठा धक्का दिलाय.

Satish Daud

राज्यात एकीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट असा राजकीय सामना रंगला असतानाच दुसरीकडे शरद पवार गटाने मनसेला मोठा धक्का दिलाय. मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय.

राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये प्रकाश जमधडे यांचा समावेश आहे. नुकताच जमधडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादीत प्रवेश करताच जयंत पाटील यांनी जमधडे यांची हवेली तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

प्रकाश जमधडे यांची वाघोली तालुक्यावर मजबूत पकड आहे. त्यांनी मनसेत असताना त्यांनी तालुक्यात तगडा जनसंपर्क ठेवला होता. वाघोलीतील विविध सार्वजनिक प्रश्नांवर जमधडे यांनी आंदोलने केली होती. इतकंच नाही तर त्यांनी नुकतीच शिरूर लोकसभा निवडणूक लढवली होती.

पण लोकसभा निवडणुकीनंतर जमधडे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याच नाराजीतून त्यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली. आता जमधडे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय. जमधडे यांच्या पक्षप्रवेशाने हवेली तालुक्यात शरद पवार गटाची ताकद आणखीच वाढली आहे.

दरम्यान, जमधडे यांच्यासोबत हवेली तालुका अध्यक्ष संदीप गोते यांच्या हस्ते त्यांच्या सोबत मनसेचे माजी हवेली तालुका उपाध्यक्ष अतिश ढगे, अक्षय चोपडे, ज्ञानेश्वर गायकवाड, किरण मिंडे, आपचे अजिक्य शेडगेसह तालुक्यातील अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात जाणं पसंत केलंय.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक बाप्पू पवार, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूबभाई शेख, जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ बाप्पू शेवाळे आदी नेते तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शिरूर - हवेली विधानसभा मतदार संघात ऐन विधानसभेच्या तोंडावर झालेल्या प्रवेशामुळे पक्षाची या भागात ताकद वाढली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

SCROLL FOR NEXT