BJP vs Ajit Pawar NCP Pune Politics News  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महायुतीत वादाच्या ठिणग्या; अजितदादांच्या आमदाराविरोधात भाजप नेते आक्रमक

Pune BJP vs Ajit Pawar NCP : विधानसभेची निवडणूक जसजसी जवळ येत आहे, तसतशा महायुतीतील घटकपक्षांमध्ये वादाच्या ठिगण्या उडत आहेत.

Satish Daud

सागर आव्हाड, साम टीव्ही

विधानसभेची निवडणूक जसजसी जवळ येत आहे, तसतशा महायुतीतील घटकपक्षांमध्ये वादाच्या ठिगण्या उडत आहेत. आधीच लाडकी बहीण योजनेच्या श्रेयावरून अजित पवार गट आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांवर टीकेचा भडिमार करत असताना आता दुसरीकडे पुण्यातील हडपसरमधील विकासकामांवरून दोन्ही गटाचे नेते पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात भाजपने दंड थोपटले आहे. इतकंच नाही तर मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास भाजप कार्यकर्त्यांनी काळे फासत आमदार तुपे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे.

महायुती धर्म फक्त भाजपने पाळायचा का? असा संतप्त सवाल भाजप (Pune BJP) पदाधिकारी शिवराज घुले यांनी विचारला आहे. हडपसरमध्ये विकासकामाचे श्रेय लाटताना भाजपला डावलण्यात आलं असा आरोप करत आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी निर्देशने सुरू केली आहे.

यावेळी आंदोलकांनी पालकमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) निवेदन देऊन नाराजी व्यक्त करणार असल्याचे सांगितले. हडपसर विधानसभा मतदारसंघात पेयजल योजना, रेल्वे उड्डाणपूल व मांजरीचा नदी उड्डाणपूल यासाठी योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्यातून निधी मिळालेला असताना विद्यमान आमदार भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलून श्रेय लाटत आहेत, असा आरोप शिवराज घुले यांना यावेळी केला.

त्याचबरोबर मांजरी उड्डाणपुलासाठी सुमारे 23 कोटी रुपये मंजूर असताना केवळ 14 कोटी 60 लाख रुपये खर्च करून बाकीचा निधी परत पाठविला, असा आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांनी केलाय. विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या हस्तक्षेपामुळे पुलाची रुंदी व उंची कमी झाल्याने भविष्यात वाहतूक कोंडीचा धोका निर्माण होईल, असा आरोप बाळासाहेब घुले यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हडपसरमध्ये भाजपला वारंवार डावललं जातंय. त्यामुळे आम्हीही महायुती धर्मास आता तिलांजली देणार, असा इशारा देखील आंदोलकांनी दिला. विधानसभेपूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी समोरासमोर आल्याने महायुतीत मिठाचा खडा पडण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT