अजित पवारांनी उबाठा शिवसेना आणि भाजपला जोरदार धक्का दिला.
पिंपरी चिंचवडमध्ये उबाठा सेना व भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल.
चार नगरसेवक आणि चार प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीची घड्याळ बांधली.
गोपाल मोटघरे, साम प्रतिनिधी
महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर नेत्यांची पळापळ सुरू झालीय. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार गट राष्ट्रवादीत बिनसलंय. येथे दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढत करण्याचे ठरलंय. दुसरीकडे शिवसेनेला सोबत घेण्याची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान अजितदादांनी डाव टाकत पिंपरी चिंचवड शहरात जोरदार धक्का दिलाय. राष्ट्रवादी पक्षानं ठाकरे गटासह भाजपलाही दणका दिलाय. अजित पवार गटात पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे ४ नगरसेवक आणि ठाकरे गटाचे ४ माजी पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश केलाय.
राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर अजित पवार अॅक्टिव्ह झालेत. पिंपरी – चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर भाजपच्या माजी नगरसेवकांनी अजित पावराच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. अजून काही स्थानिक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
भाजपच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी नगरसेविका सीमा साळवे आणि अश्विनी संतोष जाधव यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक एडवकेट सचिन भोसले, पदाधिकारी तुषार शहाणे, परशुराम आल्हाट आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे, आणि उपशराध्यक्ष नेताजी काशीद यांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
महायुतीतील घटक पक्षांनी अंतर्गत फोडाफोडी करायची नाही असं ठरलं असून पक्षांमध्ये नेत्यांची पळवापळवी चालू झालीय. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये मैत्रीपूर्व लढत होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला चोवीस तास उलटत नाहीत तोच अजित पवारांनी महायुतीत हा मिठाचा खडा टाकला. शिंदे गटाला देखील अजित पवारांनी धक्का दिलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.