Ashish Shelar Udhav Thackeray Saamtv
मुंबई/पुणे

Ashish Shelar News: 'तुमचं सर्व गेलं आहे; त्याची चिंता करा...' PM मोदींवरील टीकेवरुन आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Maharashtra Politics: घरात बसून राहणाऱ्यांना काम करणाऱ्या नेत्यांबद्दल काय कळणार.. असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, प्रतिनिधी...

Ashish Shelar On Udhav Thackeray: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली होती. देवेंद्र फडणवीस हे मस्टर मंत्री असल्याची घणाघात त्यांनी कालच्या कार्यक्रमातून केला. ठाकरेंची ही टीका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी या टीकेवरुन उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.

काय म्हणाले आशिष शेलार...

"ज्या नेत्याला स्वाभिमान नाही अशा नेत्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचे (Udhav Thackeray) नाव सर्वप्रथम येते. जे स्वतः घरात बसून राहिले. जे माझे कुटूंब माझी जबाबदारी म्हणत होते अशा लोकांना काम करणाऱ्या नेत्यांबद्दल काय कळणार.. अशा शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच भाजपची चिंता करु नका.. तुमचे सर्व गेले आहे, त्याची चिंता करा.." असा टोलाही शेलार (Ashish Shelar) यांनी लगावला.

म्हणून मोर्चा काढावा लागतोय..

"तुमचे हिरवे आणि पाक प्रेम जनतेसमोर आणण्यासाठी हिंदु मोर्चा काढावा लागतोय. हिंदुनी एकत्र आले तर उद्धवजी तुमच्या पोटात का दुखत? हा सवाल आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी हिंदु मजबूत होईल. जो त्रास काॅग्रेस, एमआयएमला होतो तो तुम्हाला का होतो?" असेही ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somvar Vrat: श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खावे अन् काय खाऊ नये

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Safe Dating Tips: डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या व्यक्तीसोबत डेटला जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

PF: नोकरी बदलली? PF अकाउंट कसं ट्रान्सफर करायचं? ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

SCROLL FOR NEXT