Talks of NCP reunification spark political tension in Pune; Sharad Pawar faction leaders express strong opposition. saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनं पुण्यात अशांतता; शरद पवार गटातील नेत्यांची नाराजी

Sharad Pawar-Ajit Pawar Alliance: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या अटकळीमुळे पुण्यात अशांतता पसरलीय. या चर्चांनंतर पदाधिकारी नाराज झालेत. प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या नेत्यांनी या कल्पनेला विरोध केलाय. महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय परिणामांचा इशारा दिला आहे.

Bharat Jadhav

  • पुण्यात राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा

  • प्रशांत जगताप यांनी राजकारण सोडण्याचे संकेत दिलेत.

  • महानगरपालिका निवडणुकांवर या घडामोडींचा थेट परिणाम होण्याची शक्यता.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. पुढच्या काही दिवसात महानगरपालिकेच्याही निवडणुका होणार आहेत. त्याचदरम्यान पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झालीय. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर पदाधिकारी नाराज झालेत. शरद पवार गटातील नेत्यानं थेट राजकारण सोडण्याचे संकेत दिलेत. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या निर्णयाला विरोध केला होता.

सध्या राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरूय. याबाबत माझं मत आहे की, राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. जर एकत्र लढायची वेळ आली तर प्रशांत जगताप काही काळासाठी राजकारणातून बाहेर पडेल. माझं अजित पवार यांच्याविषयी काहीही मत नसून शरद पवारांची पुरोगामी चळवळ बघून मी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचं प्रशांत जगताप म्हणाले.

सध्या अजित पवार भाजपासोबत आहेत. त्यांचं तिथं पटत नाही म्हणून त्यांना सोबत घेतलं. तर उद्या परत ते सत्तेत जाऊन बसतील. हे न पटणारंय. पुणेकर महायुतीवर नाराज असून ते महाविकास आघाडी सोबत आहेत. जर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले, आणि जोपर्यंत राजकारण स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपण राजकारणातून बाहेर पडू, असे सांगत प्रशांत जगताप म्हणालेत.

शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनीही प्रशांत जगताप यांच्याबाबत ट्विट करत त्यांच्या निर्णयावर भाष्य केलंय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलीय. प्रशांतदादा जगताप यांनी राजकारणातून दूर जाण्याचा निर्णय घेऊ नये. अन्यायविरोधात आवाज उठविणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. लढवय्या कार्यकर्त्याने असा निर्णय घेऊ नये. आपल्या हातून या पुण्यनगरीची अजून खूप सेवा बाकी आहे, अशा आशयाची पोस्ट रविंद धंगेकर यांनी केली होती. दरम्यान या पोस्टला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी रिप्लाय दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नव्या वर्षात ५ गोष्टींच्या नियमात होणार मोठा बदल; UPI ते आधार कार्डमध्ये काय होणार बदल?

Salman Khan: 'भाऊंची भेळ...'; सलमान खानने रितेशसाठी बनवली खास भेळ, जेनिलियाने पोस्ट केलेला VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार

Maharashtra Politics: भाजप उमेदवाराच्या रॅलीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या घोषणा|VIDEO

भाजप कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त; उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावंत नाराज, RPI कार्यकर्तेही भडकले

SCROLL FOR NEXT