raj and uddhav thackeray x
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: मुंबईत ठाकरे बंधूंना मोठा धक्का, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेगटात प्रवेश

raj thackeray and uddhav thackeray: मुंबईत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडली. ठाकरे बंधूंना एकनाथ शिंदेंनी मोठा धक्का दिला. पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.

Priya More

Summary -

  • शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला मुंबईत मोठा धक्का

  • अनेक पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेगटात प्रवेश

  • प्राश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश सोहळा पार पडला

  • मुंबईत शिंदे गटाची ताकद वाढली

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सर्वच राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचे पक्षांतर सुरू आहे. अशातच मुंबईत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला. शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि भाजपच्या अनेक बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मागाठणे, दहिसर परिसरात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला. त्याचसोबत याच ठिकाणी भाजप आणि काँग्रेसला देखील मोठं खिंडार पडलं आहे. चारही पक्षातील बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे याठिकाणी शिंदेगटाची ताकद वाढली.

मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र.५ मधील शिवसेना ठाकरे गटाचे शाखा समन्वयक मनीष प्रभू, गटप्रमुख प्रकाश साबळे, भूषण माळवदे यांच्यासह मनसेचे सुधीर करपे आणि रामचंद्र पाटील तसेच प्रभाग २७ मधील भाजपच्या दिपाली माटे खान, प्रभाग १५ मधील काँग्रेस ब्लॉक प्रेसिडेंट निकी नंदनिया यांच्यासोबतही मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या कार्यक्रमाला विभागप्रमुख मनोहर देसाई, माजी नगरसेवक संजय घाडी यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani Firing: जुना वाद पुन्हा उफाळला; प्राध्यपक मुंडेंच्या घरावर बेछूट गोळीबार,परिसरात खळबळ

Weight Loss : वजन कमी करणाऱ्यांसाठी पोहे वरदान, फक्त टाका 'हे' २ पदार्थ

Maharashtra News Live Update: नाशिक- संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

MS Dhoni Injury Update : चेन्नई सुपर किंग्ज संकटात असतानाच महेंद्रसिंग धोनी घेणार मोठा निर्णय

Mumbai High Court: ऑफिसमध्ये महिला सहकाऱ्याच्या स्तनांकडे एकटक बघणे गुन्हा नाही, मुंबई हायकोर्टाने काय दिला निकाल?

SCROLL FOR NEXT