Raj Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

MNS News: 'मराठी माणसांना जेरीस आणून राजधानी हिसकावली जातेय, पण..; मुलूंड प्रकरणानंतर राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून फटकारे

MNS On Mulund Incident: 'मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत...' असे म्हणत मनसेने राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.

Gangappa Pujari

MNS News:

मुंबईच्या मुलुंडमध्ये (Mulund) मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. या प्रकरणाची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा रंगली होती. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत गुजराती पिता- पुत्राला माफी मागायला लावली. या घटनेनंतर राज ठाकरे यांचे व्यंगचित्र शेअर करत मनसेने संताप व्यक्त केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तृप्ती देवरुखकर (Trupti Devrukhkar) या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला होता. तृप्ती देवरुखकर या आपल्या पतीसह मुंबईतील मुलुंड पश्चिममध्ये ऑफिस भाड्याने घेण्यासाठी गेल्या होत्या.

तेथे एका सोसायटीमध्ये त्या ऑफिस पाहण्यासाठी गेल्या असता तिथे त्या मराठी असल्याने त्यांना ऑफिस मिळणार नाही असं त्या सोसायटीच्या सेक्रेटरीने सांगितले. तसेच याबाबत तृप्ती यांना जाब विचारला असता त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरण्यात आली. या प्रकरणानंतर मनसेने (MNS) आक्रमक भूमिका घेत संबंधित पिता- पुत्राला माफी मागायला लावली.

(मराठी धमण्यांना चेतवू नका... rahul gadpale writes marathi people rsidence maharashtra | Sakal (esakal.com)

मनसेचे ट्वीट...

या घटनेनंतर मनसेने संतप्त प्रतिक्रिया देत राज ठाकरेंचे (Raj Thackeray) एक जुने व्यंगचित्र शेअर केले आहे. या व्यंगचित्रातून "राजधानी हातातून गेली कि राज्य गेले. आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे. पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत..." अशा शब्दात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' ब्लड ग्रुपच्या व्यक्ती असतात सर्वात हुशार, प्रत्येक कामात मिळतं यश

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

SCROLL FOR NEXT