मनसेचे अंधेरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी पक्षाला राम राम ठोकला.
ऐन निवडणुकीत मनसेला मोठा धक्का
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
संजय गडदे, साम प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी अंधेरीत एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना धक्का दिलाय. मनसेचे अंधेरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी मनसेला राम राम ठोकला. रोहन सावंत यांनी इंजिनची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रोहन सावंत यांनी आपल्या समर्थकांसोबत शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे.
दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरें बंधूंची युती झाली आहे. मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जबरदस्त रणनीती आखलीय. भाजप आणि महायुतीला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी कंबर कसली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने महायुतीसमोरील आव्हान वाढलंय. पण ठाकरेंची ताकद करण्यासाठी भाजपसह शिवसेना म्हणजचे शिंदे गटानं मनसेच्या नेत्याना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे.
अंधेरीत शिवसेनेने मनसेचे व विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांना आपल्या गोटात ओढून आणलंय. रोहन सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणण्यात आमदार मुरजी पटेल यांची मोठी भूमिका आहे. ऐन महापालिका निवडणुकीत शिंदे गटात रोहन सावंत यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे अंधेरीत मनसेला मोठा धक्का बसलाय.
रोहन सावंत प्रभाग 75 मधून मनसेकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. मात्र ऐननिवडणुकीत रोहन सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केल्यानं मनसेला मोठा धक्का बसला आहे. रोहन सावंत यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे अंधेरीत मनसेची ताकत कमी झाली आहे. त्यासोबत कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठी नाराजी पसरली आहे.
काँग्रेसमध्ये तब्बल ४० वर्षे कार्यरत असलेल्या चौथीप्रसाद गुप्ता यांनी काँग्रेसला राम राम ठोकलाय. समाजवादी पक्षाकडून चौथीप्रसाद गुप्ता यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून दहिसर प्रभाग ३ मधील लढत अधिक रंगतदार केली होती. भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर मैदानात असल्याने थेट मोठी राजकीय टक्कर होती. परंतु स्थानिक उमेदवार विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशी लढत होणार असल्याचा दावा चौथीप्रसाद गुप्ता यांनी केला होता. दहिसरची जनता स्थानिक कार्यकर्त्यालाच साथ देईल,” असा विश्वास गुप्ता यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.