Raj Thackeray lashes out at the Election Commission during the Shivalay meeting over voter list irregularities in Maharashtra. Saam TV Marathi News
मुंबई/पुणे

Maharashtra Voter List मुलीचं वय १३४ अन् वडिलांचं ४०; राज ठाकरे आयोगावर भडकले, वाचा नेमकं काय म्हणाले

Raj Thackeray demands postponement of Maharashtra local body elections : मुलीचं वय १३४ आणि वडिलांचं ४०, या मतदार यादीतील घोळावरून राज ठाकरे आयोगावर चांगलेच संतापले. निवडणूक आयोगावर टीका करत त्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray questions Election Commission over 134-year-old voter record : मुलीचे वय १३४ आणि वडिलांचे वय ४०, कुणी कुणाला काढले? मतदार यादीतील घोळावरून राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला संतप्त सवाल केला. मनसे अन् मविआचे सर्वपश्रीय शिष्टमंडाने आज शिवालयमध्ये आयोगाची भेट घेतली. यावेळी मतदार यादीतील घोळावरून राज ठाकरेंनी आयोगाला धारेवर धरलं. जोपर्यंत सर्व पक्षाची सहमती येत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मागणीही राज ठाकरेंनी केली. राजकीय पक्षांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी काम करता असं दिसतंय, असा आरोपही त्यांनी यावेळी केली. (MNS chief Raj Thackeray attacks EC for voter list irregularities)

निवडणूक पुढे ढकला - राज ठाकरे Raj Thackeray slams Election Commission during Shivalay meeting

५ वर्षं निवडणूक घेतली नाही, अजून ६ महिने निवडणूक घेऊ नका. जोपर्यंत पारदर्शकता येणार नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊच नका, असे राज ठाकरे म्हणाले. बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागत असेल तर लागू देत. निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काय काम आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही आम्ही तयार नाहीत, असे सुप्रीम कोर्टाला सांगा, निवडणूक पुढे ढकला, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

थोरातांचा पराभव कसा झाला? - राज ठाकरे Raj Thackeray accuses EC of bias towards ruling parties

बाळासाहेब थोरात हे ८ टर्म ८०-९० हजार मतांनी निवडणूक जिंकत आले आहेत. यंदा एक लाखाने पडले, हे कसे शक्य आहे? असा सवाल करत राज ठाकरेंनी आयोगाला धारेवर धरले. राजकीय पक्षांना क्लिअर झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका. तोपर्यंत निवडणूक कार्यक्रम रद्द करा. राजकीय पक्ष निवडणुका लढवतं, त्यांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

आमचा मतदारांशी संबंध येतो, तुमचा नाही - राज ठाकरे

मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी ? सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे. तुम्हीच सगळे ठरवणार..निवडणूक आम्ही लढवतो व तुम्ही निवडणूक कंडक्ट करता. आठ दिवसांची फक्त मुदत देता. निवडणुका कशा लढवायच्या सांगा. हे काही क्लिष्ट प्रश्न नाहीत. आमचा मतदारांशी संबंध येतो, तुमचा नाही. ते आम्हाला मतदान करतात. पण मतदारांच्या यादीची ही पारदर्शकता आहे का? २०२२ ला बेसावध राहिलो. सगळं व्यवस्थित केल्याशिवाय निवडणुका घेता नाही येणार. इतकी वर्षे झाली आता नाही होणार, असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Crime : पती बेपत्ता असल्याची तक्रार;दीड महिन्यानंतर धक्कादायक माहिती आली समोर, प्रियकराच्या मदतीने नदीत जिवंत फेकले

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी जाहीर, कधी, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

Bogus Voter List : 'प्रत्येक ठिकाणी 4 लाख बोगस मतदार'; व्होटचोरीचं लोण मुंबईपर्यंत, वाचा स्पेशल रिपोर्ट

Pothole Deaths : 'खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना भरपाई'; मुंबई हायकोर्टाने काय निर्णय दिला? जाणून घ्या

Makyacha Chivda Recipe: दिवाळीसाठी कुरकुरीत खमंग मक्याचा चिवडा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT