Raj Thackeray Press Conference Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray : भूमिका बदलली नाही, धोरणावर कायम; राज ठाकरे

Raj Thackeray Press Conference: भूमिका बदलली नाही. धोरणावर कायम असल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. आज पत्रकार परिषदेमद्ये बोलताना त्यांनी प्रमुख शहरांमध्ये सभा घेणार असल्याचं सांगितलं आहे.

Rohini Gudaghe

गुढीपाडवा मेळाव्यात भूमिका मांडल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची आज पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना भूमिका बदलली नाही. धोरणावर कायम असल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. आज पत्रकार परिषदेमद्ये बोलताना त्यांनी प्रमुख शहरांमध्ये सभा घेणार असल्याचं सांगितलं (Maharashtra Politics) आहे.

राज ठाकरे म्हणाले की, यंदा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्याचं विश्लेषण देखील केलं आहे. पहिल्या पाच वर्षात जे पटलं नाही त्याचा विरोध देखील केला आहे. लोकं म्हणतात की, राज ठाकरे यांनी भूमिका (Raj Thackeray Press Conference) बदलली आहे. भूमिका बदलली नाही. धोरणावर कायम असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदींना बिनशर्थ पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं. राज ठाकरेंच्या या निर्णयांचं अनेक मनसे सैनिकांनी समर्थन केलं होत, तर अनेकांनी नाराजी (Raj Thackeray) जाहीर केली होती. त्यांच्या या निर्णयानंतर अनेकांनी राजीनामे देखील दिले होते. राज ठाकरेंनी भूमिका बदलल्यामुळे मनसे सैनिक नाराज असल्याचं समोर आलं होतं. यावर आज राज ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. त्यांनी भूमिकेवर कायम असल्याचं सांगितलं आहे.

३७० कलम हटलं, राम मंदिर झालं. १९७० पासून रखडलेली गोष्ट झाली. ज्या कार सेकाकांचा बळी गेला, त्यांचे आत्मे राम मंदिर उभे राहिल्यानंतर शांत झाले असतील, असंही त्यांनी बोलताना म्हटलं (Lok Sabha Election) आहे. नरेंद्र मोदी नसते तर हा मुद्दा प्रलंबित राहिला असता, परंतु मोदींमुळे तो पूर्ण झाला आहे. आता त्यांना पुन्हा एकदा संधी देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत. त्यामुळं त्यांचं गुजरात प्रेम ठिक आहे. पण त्यांनी सगळ्याच राज्यांकडे लक्ष द्यावं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, मोदींना पाठिंबा दिला त्या संदर्भात आज पक्षातील नेत्यांशी संवाद साधला आहे. महायुतीत प्रचार करण्यासाठी आणि समनव्य करण्यासाठी आमच्या लोकांची बैठक झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: चांदिवली विधानसभेत शिंदे गटाला धक्का; नसीम खान आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT