Tuesday Horoscope: जवळचा व्यक्तीच देईल धोका, ५ राशींचा पैसा जाणार वाया; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

आज विनायक चतुर्थी रिक्ता तिथी.आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्या देण्यासाठीच असतात हे समजून घ्या. रिक्त होऊन जा. मात्र आपल्या तापटपणावर नियंत्रण ठेवून पुढे जावे लागेल .

वृषभ

देवी उपासना छान फले देणारी ठरेल. कितीही केले तरी आपण केलेल्या प्रयत्नांना यश तेव्हाच असते जेव्हा भगवंताची कृपा असते. भाग्यकारक घटना घडणार आहेत.

मिथुन

काय ठरवले आणि काय होत आहे ! अशी भावना मनात कधी येते. आज या गोष्टी जास्त उफाळून येतील. एकट्याने प्रवास करताना थकून जाल. पण येणाऱ्या अडचणी स्वीकारून तुम्हालाच पुढे जावे लागेल. अचानक धनलाभ मात्र दिसतो आहे .

कर्क

संसारिक सुखामध्ये मन रमणार आहे. काही नव्याने वस्तूंची खरेदी घरी होईल. जोडीदाराला काय हवं काय नको याची जातीने आज चौकशी कराल.

सिंह

पाठीचे दुखणे डोके वर काढतील. कष्टाला पर्याय नाही पण यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या अधिकार मिळू शकेल. मामाकडून विशेष फायदा संभवतो आहे.

कन्या

विष्णू उपासना, गणेश उपासना आज फलदायी ठरणार आहेत.विनायक चतुर्थीची विशेष उपासना करावी. पैशाची निगडित व्यवहार होतील.

तूळ

सर्व सुखांसाठी दिवस चांगला आहे .संततीसाठी मात्र काहीतरी खर्च होईल. कुटुंबीयांकडून चांगल्या चार आनंदाच्या वार्ता कानावर येतील.

वृश्चिक

घराचे व्यवहार मार्गी लागले असतील तर आज त्यासाठी पैशाची तजबीज करावी लागेल. यासाठी आपले शेजारी जवळचे नातेवाईक किंवा भावंडे यांची मदत होऊ शकेल.

धनु

भावंडांसाठी काहीतरी खर्च करावा लागेल. जे मिळाले आहे त्यात समाधान मानणे आज गरजेचं आहे. गुंतवणूक मात्र योग्य ठरेल.

मकर

अनेक गोष्टी मनामध्ये ठेवून आपण नेहमीच वावरता. आज काही गोष्टींना वहिवाट करून दिलेले चांगले राहील. जवळच्या व्यक्तीला मनोगत सांगा. हृद्य भावना व्यक्त करा.

कुंभ

स्वतःसाठी पैसा खर्च करा. जसे की काही खरेदी, कदाचित तब्येतीच्या तक्रारी असतील तर औषधावर खर्च होईल. जवळचा व्यक्तीकडून धोका मिळण्याची शक्यता आहे.

मीन

सजगतेने कामे करावे लागतील. यश तुमचेच आहे हे लक्षात ठेवून चला. गुंतवणुकीतून लाभ. घरासाठी नाहक खर्च होतील.