Hitendra Thakur On Vinod Tawade Saam Tv
मुंबई/पुणे

Vinod Tawde Money Distribution: ५ कोटी घेऊन आले, २५ वेळा फोन करून मागितली माफी; हितेंद्र ठाकूर खळबळजनक आरोप

Hitendra Thakur On Vinod Tawade: विनोद तावडे यांनी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप केला जात आहे. यासंदर्भात व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता यावर हितेंद्र ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत खळबळजनक आरोप केला आहे.

Priya More

Vinod Tawde Distributing 5 Crore in Virar: विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. राज्यातील वातावरण चांगेलच तापलेले दिसत आहे. विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि विनोद तावडे यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. विरार पूर्वच्या विवांत हॉटेलमध्ये हा राडा झाला. अशामध्ये हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्याव खळबळजनक आरोप केले आहेत. 'विनोद तावडे ५ कोटी घेऊन आले होते. त्यांना २५ वेळा फोन करून माफी मागितली.' असे वक्तव्य हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे.

बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, 'विनोद तावडे विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन आले होते. पोलिस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा दोन डायऱ्याही सापडल्या. त्या डायरीमध्ये १५ कोटींची नोंद होती. ' तसंच, 'विनोद तावडे सांगतात की, तिकडे बैठक सुरु होती. पण मतदानाच्या ४८ तासआधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात. असे असताना भाजपच्या राष्ट्रीय नेत्याला याची माहिती नाही का, ऐवढी अक्कल विनोद तावडेंना नाही का? असा सवाल हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

विनोद तावडे याठिकाणी लोकांना वाटण्यासाठी १५ कोटी रुपये घेऊन आले होते. आता पोलिस याप्रकरणात काय कारवाई करणार हे पहावे लागेल. सरकार त्यांचेच आहे त्यामुळे पुढे काही होणार नाही, असेही हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. या घटनेवरून विरारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरार पूर्वेकडील वितांत हॉटेलमधील राड्याचे आणि विनोद तावडे त्याठिकाणी बसले असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Manikrao Kokate : काहीतरी मोठं होणार? माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, अजित पवारांनी दौरे रद्द केले, CM फडणवीसांची घेतली भेट

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

SCROLL FOR NEXT