विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पुण्यात सभा होणार आहे. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मोदीची ही सभा पुण्याच्या टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी पुण्यातील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहे. हे बदल कोणते आहेत ते आपण पाहाणार आहोत...
पीएम मोदींच्या सभेच्या आयोजनामुळे सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी परिसरातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा प्रमुख रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. हे बंद असलेले मार्ग पंतप्रधानांच्या सुरक्षा आणि वाहतूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आहेत. त्यामुळे संबंधित भागात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून नीलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याचा वापर करून सिंहगड रस्त्याकडे प्रवास करावा, असे वाहतूक विभागाकडून सूचित करण्यात आले आहे. यामुळे सभास्थळाभोवती वाहतुकीची कोंडी टाळण्यास मदत होणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता असल्याने,पुण्यातील प्रमुख मार्गांवर संभाव्य कोंडी टाळण्यासाठी पोलिस विभागाने योग्य त्या सूचना दिल्या आहेत.पुणे शहरात येणाऱ्या प्रवाशांनी आणि नागरिकांनी या मार्गांबद्दल माहिती घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.