सचिन जाधव, पुणे|ता. १० मार्च २०२४
राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट तसेच काँग्रेस नेत्यांमध्ये सध्या जागा वाटपासंदर्भात बैठका सुरू आहेत. तसेच महाविकास आघाडी आणि वंचितच्या युतीबद्दलही चर्चा सुरू आहेत. अशातच आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात जयंत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे.
"महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) जागा वाटपासंदर्भात आमची यादी तयार आहे. काही अडचण नाही. चर्चा चांगली झाली आहे. प्रस्ताव घेतलाय त्यांनी त्याच्या कार्यकारणी समोर मांडला आहे. मात्र वंचितशी पूर्ण जागा वाटप झाल्याशिवाय जागा जाहीर करणार नाही, प्रकाश आंबेडकरसोबत येतील असा विश्वास आहे," असे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केले.
"केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्यावरुनही जयंत पाटील यांनी महत्वाचे विधान केले. देशात वन नेशन वन इलेक्शन तसेच वन नेशन एक कमिशनर अस असेल. एका आयुक्त निवडणुका घेता येतील असं वाटत नाही, हे योग्य नाही. आयुक्तांनी राजीनामा देण्यासारखं असं काय घडलं हे देशासमोर यायला हवं," असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.
राज ठाकरेंना उत्तर..
दरम्यान, राज ठाकरे यांनी शरद पवार जिंकलेली लोक घेतात, राष्ट्रवादीला पक्ष मानत नाही, अशी टीका केली होती. यावर बोलताना जयंत पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशात राज्यात राजकारण केलं. जनतेच्या मनातील लोकांना ते घेतात. निवडणूक जिंकणाऱ्या निवडून आणून ते मोळी बांधतात. ज्यांना मोळी बांधता आली नाही त्यांच्यावर काय बोलणार? असे म्हणत जयंत पाटील यांनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.