अभिजित देशमुख
डोंबिवली : डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम स्टेशन परिसरात सुशोभीकरण व स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी केडीएमसी (KDMC) व राज्य शासनाच्या माध्यमातून ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. आज या (Dombivali) कामाचे भूमिपूजन माजी स्थायी समिती सभापती युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. (Latest Marathi News)
डोंबिवली रेल्वे स्टेशनवर दररोज तीन लाखाहून अधिक प्रवासी ये- जा करत असतात. या प्रवाशांना रेल्वे स्टेशन बाहेर येण्यासाठी तसेच स्टेशनला जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. फुटपाथवरील अतिक्रमण स्टेशन परिसरातील अस्वच्छता, अस्तव्यस्त उभ्या असलेल्या रिक्षा, वाहतूक कोंडी यामुळे स्टेशन (Railway Station) परिसराला बकालपणा आला होता. सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या डोंबिवली स्टेशन परिसरात सुशोभीकरण व रस्ते देखभाल दुरुस्ती रिक्षांचे नियोजनाची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी खासदार शिंदे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला मंजूर करण्यात आला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
डोंबिवली स्टेशन परिसरात आज सुशोभीकरण व देखभाल दुरुस्तीच्या कामांचे भूमिपूजन झाले. सुशोभीकरन अंतर्गत स्टेशन परिसरातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, रिक्षा स्टँडचे नियोजन, डिव्हायडरमध्ये वृक्षारोपण, स्टेशन परिसरातील भिंती व पूलाना रंगरंगोटी असे विविध उपक्रम साकारण्यात येणार आहेत. त्यामुळे डोंबिवली स्टेशन परिसराचा कायापालट होणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.