Gulabrao Patil On Cm Eknath Shinde  Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: गृहखात्यावर शिंदे गट ठाम, शपथविधी सोहळ्यापूर्वी गुलाबराव पाटील यांचं मोठं विधान

Gulabrao Patil On CM Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. पण या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब असल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Priya More

नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होणार असल्याची चर्चा सुरू होती. पण यामध्ये ट्विस्ट आला आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे.

या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुलाबराव पाटील यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना मोठं विधान केले आहे. 'काळजीवाहू मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सर्वांनी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली की ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तर गृहखातं शिंदेसाहेबांना मिळावं अशी आजही आमची मागणी आहे.', असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची शपथविधी समारंभाची गुलाबी पत्रिका व्हायरल झाली आहे. शपथविधी पत्रिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. या शपथविधी पत्रिकेवर एकनाथ शिंदे यांचे नाव दिसत नसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ही शपथविधीची पत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेकडून काढण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर देखील एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाहीये. या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचे नाव गायब झाल्यामुळे ते आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children's Day 2025 Speech: मुलांना मराठीत लिहून द्या बालदिनानिमित्त भाषण; टाळ्यांच्या कडकडाटा होईल कौतुक

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

Black Dark Lips: ओठांवरचा काळपटपणा कसा दूर कराल? या जादुई टिप्स वाचा

काँग्रेस उमेदवाराची कमाल, डिपॉझिट म्हणून चिल्लर भरली; निवडणूक अधिकारीही चक्रावले|VIDEO

SCROLL FOR NEXT