Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra News : एकनाथ शिंदेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील; शिंदे गटाच्या खासदाराचा सर्वात मोठा दावा, VIDEO

Maharashtra Political Latest News : शिवसेना शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठं विधान केलंय. महायुती आगामी विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवणार, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय.

Satish Daud

प्रमोद जगताप, साम टीव्ही

केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत असताना देखील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठं विधान केलंय. महायुती आगामी विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवणार, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय.

इतकंच नाही, तर राज्यात महायुतीचं सरकार आल्यास पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री बनतील. कारण, शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या, तर मुख्यमंत्री पदावर त्यांचाच दावा आहे, असंही खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. नरेश म्हस्के यांच्या या दाव्याने महायुतीत वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले नरेश म्हस्के?

संसदेचे पावसाळी अधिवेशन आज सोमवारपासून सुरू झाले आहे. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करणार आहे. यानिमित्ताने एनडीए आणि इंडिया आघाडीचे खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातूनही महायुती तसेच महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीकडे कूच केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के दिल्लीत दाखल झाले आहेत.

यावेळी त्यांनी साम टीव्हीसोबत संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर म्हस्के यांनी टीकाही केली. सोनिया गांधी यांचं किंवा राहुल गांधी यांचं काही काम असेल म्हणून ते आज्ञेच पालन करण्यासाठी येत असतील, असा टोला म्हस्के यांनी हाणाला.

एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजितदादा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर्स लावले. यावरही नरेश म्हस्के यांनी भाष्य केलं. कार्यकर्ते नेहमीच असे बॅनर लावत असतात. अजितदादा हे त्यांना बॅनर्स लावायचं सांगत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात महायुती विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदेंच असतील, असंही नरेश म्हस्के म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac Signs Today: बुधाचा उच्चस्थानी योग, सूर्य-चंद्राचा संयोग; या ४ राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळ अन् मुंबई मेट्रो-३ चे उद्घाटन

Gold Rate : सोनं प्रति तोळा ७७ हजारांवर येणार, धक्कादायक कारण आलं समोर, वाचा...

Mosquitoes : दारू पिणारे डासांना चावायला आवडतात? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Manoj Jarange : 'मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा'; कुणी केली सरकारकडे मागणी? VIDEO

SCROLL FOR NEXT