Eknath Shinde yandex
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: पुढच्या निवडणुकांसाठी तयार राहा, शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांना एकनाथ शिंदेंचे आदेश

Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या पराभूत उमेदवरांसोबत बैठक घेतली. टेंभीनाका येथील आनंदश्रम येथे शिवसेनेच्या नेत्यांची ही महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी शिवसेना नेत्यांना महत्वाचे आदेश दिले.

Priya More

वैदेही काणेकर, मुंबई

शिवसेनेचे मुख्य नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पराभूत उमेदवरांना पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज रहाण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना लोकसभा गटनेते खासदार श्रीकांत शिंदे यांनीही सर्व पराभूत उमेदवारांना विश्वास देत राज्यात पुढील ३ महिन्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या पराभूत उमेदवरांसोबत बैठक घेतली. टेंभीनाका येथील आनंदश्रम येथे शिवसेनेच्या नेत्यांची ही महत्वपूर्ण बैठक पार पडली. शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांनी उमेद न हारता स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी तळागाळत आपल्या यशस्वी योजनांची माहिती देऊन विधानसभा निवडणुकीत शिवसेनेवर जनतेने दाखवलेला विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवण्यासाठी रणनिती आखून सर्वांनी कामाला लागले पाहिजे, असे आदेश दिले.

शिवसेना नेत्यांच्या या बैठकीमध्ये शिवसेना नेते आनंदराव अडसुळ, रामदास कदम, खासदार नरेश म्हस्के, राहूल शेवाळे आणि भावना गवळी यांनीही सर्व पराभूत उमेदवारांना मार्गदर्शन केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर आता शिवसेनेचे नेते पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे यश मिळाले तसंच यश स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीमध्ये मिळावे यासाठी शिवसेना नेत्यांकडून आताच कंबर कसण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी देखील राज्यामध्ये अद्याप नवं सरकार स्थापन झाले नाही. राज्याचे नवे मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पण गृहमंत्रिपदावरून भाजप आणि शिवेसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे.

गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असावे असे भाजपचे म्हणणे आहे. तर गृहमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना मिळावं अशी शिवसेनेची आग्रही भूमिका आहे. अशामध्ये महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेला वाद संपून हा शपथविधी सोहळा कधी होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT