shinde government news  saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde Government : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान कुणाला?; पाहा संभाव्य मंत्र्यांची नावं

शिंदे सरकारमध्ये कुणा-कुणाची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकीकडे राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहचला असतानाच, दुसरीकडे शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने आता मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात नेमकी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच शिंदे सरकारमध्ये कुणा-कुणाची वर्णी लागणार याची संभाव्य यादी समोर आली आहे. (Eknath Shinde Todays News)

सरकार कायदेशीर की बेकायदेशीर? यावरून सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत कोर्टाने शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी घेण्यात येईल असं सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं. कोर्टाच्या निकालानंतर शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराचा निर्णय होणार आहे. पण त्याआधी मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली आहे.

भाजपकडून मंत्रिपदासाठी ही नावं चर्चेत

मंत्रिमंडळ विस्तारात भाजप अजून एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपकडून मंत्रिपदासाठी अपक्ष आमदार रवी राणा यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रवी राणा हे अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे पती आहेत. (Eknath Shinde Government Cabinet Expansion)

गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणांनी संसदेत मोदी सरकारचं केलेलं समर्थन बघता रवी राणा यांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.

शिंदे गटातून मंत्रिपदासाठी कुणाची वर्णी?

शिंदे गटातून मंत्रिपदासाठी शंभूराजे देसाई, औरंबादचे आमदार संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे. ज्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडून मंत्रिपद भूषवलं आहे. अशाच आमदारांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती आहे.

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?

मंत्रिमंडळाचा दोन टप्प्यात विस्तार होणार आहे. त्यापैकी पहिला विस्तार हा 5 ऑगस्टला होणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 ते 16 मंत्री शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या शपथविधीच्या कार्यक्रमाला थेट केंद्रातील भाजप नेते येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचा 60-40 असा फॉर्म्युला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीला 15 ते 16 मंत्र्यांचा शपविधी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजप गृह खातं स्वत:कडे ठेवणार असल्याची माहिती आहे. 60-40 असा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. या विस्तारात शिवसेनेतील शिंदे गटाच्या अनेक माजी मंत्र्यांना वेट अॅड वॉचवर ठेवणार. मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: देवेंद्र फडणवीस यांच्या अस्तित्वाची लढाई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई - संजय राऊत

Health Tips: महिलांनी 'या' समस्येत अननसाचे सेवन करणे टाळावे

Jalgaon News: जळगावात सोन्याची गाडी पकडली, ५ कोटींचं घबाड जप्त

Palak Puri Recipe : अवघ्या 10 मिनिटात खस्ता पालक पुरी; वाचा संपुर्ण रेसिपी

Dry Day in Mumbai : तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईत चार दिवस 'ड्राय डे'

SCROLL FOR NEXT